आरती सुरु असताना 100 वर्ष जुने कडुलिंबाचं झाड कोसळले, ७ जण दगावले

3204 0

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड कोसळल्याने सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हे घटना काल रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या ठिकाणी भाविक एका दुःख निवारण कार्यक्रमासाठी एकत्र आले होते.

बाबूजी महाराज मंदिरात दर रविवारी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. रविवारी रात्री १० वाजता या ठिकाणी दुःख निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भाविक सभामंडपात एकत्र जमले होते. आरती सुरु असताना संध्याकाळी वातावरणात बदल होऊन वादळी वारा आल्यामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडखाली काही भाविक जमले असतंच अचानक अंदाजे १०० वर्षाचे जुने कडुनिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या घटनेत सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. 29 जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याला सुरुवात केली. झाड एवढं मोठं होतं की क्रेन आणल्यावरही झाडं उचललं जात नव्हतं. ‘माझ्या आयुष्यात मी अशी घटना पाहिली नाही. ही सर्वात मोठी दुर्देवी घटना घडली. इथली स्थिती पाहून काय बोलावं हेच कळत नव्हते. स्थानिक लोक, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब आले. त्यांनी मदत कार्यही सुरू केलं’ असं आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासन आणि विद्युत विभाग तसेच महसूल विभाग आरोग्य विभागाला तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या. तसेच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क करून त्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भारतीय भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही या घटनेची माहिती घेतली.

Share This News

Related Post

Breaking News ! नवज्योत सिंह सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- नवज्योत सिंह सिद्धू यांना 34 वर्ष जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988…

‘आरटीई’ साठी सोमवारपासून शाळा नोंदणी सुरू; आरटीई अंतर्गत 25% जागा दुर्बल घटकांसाठी राखीव ! कोणकोणती कागदपत्रं आवश्यक ?

Posted by - January 21, 2023 0
शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25% जागांसाठीची शाळा नोंदणीची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. 23…
Obc Reservation

Obc Reservation: अखेर ! 21 दिवसांनंतर ओबीसी आंदोलन मागे

Posted by - September 30, 2023 0
चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून (Obc Reservation) मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरु होते. दरम्यान…
Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…
Jalna News

Jalna News : “मी मेल्यावर तू रडशील का?” असे स्टेटस ठेवत तरुणाने अवघ्या 22 व्या वर्षी घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Posted by - August 28, 2023 0
जालना : आजकाल जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे. याचा प्रत्यय देणारी घटना जालनामध्ये (Jalna News) उघडकीस आली आहे. यामध्ये (Jalna…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *