#Travel Diary : कमी बजेटमध्ये संस्मरणीय सुट्ट्या घालवायच्या असतील तर ही पर्यटन स्थळे आहेत परफेक्ट

578 0

उन्हाळी पर्यटनस्थळे : मार्च महिना येताच उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीचे प्लॅनिंग करू लागतात. पण सुट्टीवर जाण्यासाठी लोक आपल्या बजेटचीही विशेष काळजी घेतात. अशा तऱ्हेने जर तुम्हीही तुमच्या मित्र- मैत्रिणी, कुटुंब किंवा पार्टनरसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमची परफेक्ट सुट्टी तर घालवू शकालच, पण कमी बजेटमध्ये भरपूर एन्जॉय ही करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही व्हेकेशन डेस्टिनेशन्सबद्दल… 

ऋषिकेश

ऋषिकेश में 12 प्रसिद्ध मंदिर (12 Famous Temples In Rishikesh) जो की ...

जर तुम्हाला तुमची सुट्टी कमी पैशात आरामात घालवायची असेल तर त्यासाठी तुम्ही उत्तराखंडमधील ऋषिकेशला जाऊ शकता. इथले सुंदर नजारे तुम्हाला आनंद तर देतीलच, पण गंगेच्या तीरावरील आरती मनाला विश्रांती देईल. तसेच तुम्ही साहसप्रेमी असाल तर येथे ट्रेकिंग, राफ्टिंगचा ही आनंद घेऊ शकता.

बनारस

बनारस - भारत का वो शहर जहाँ सुकून के लिए आते हैं दुनियाभर के लोग
उत्तर प्रदेशातील बनारस जगभर प्रसिद्ध आहे. या शहराचं सौंदर्य बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्येही पाहायला मिळालं आहे. बनारस हे या महिन्यात फिरण्यासाठी योग्य ठिकाण ठरेल. दोन-तीन दिवसांत तुम्ही इथल्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांना भेट देऊ शकता. तसेच येथे राहण्याचा आणि फिरण्याचा खर्च आपल्या बजेटनुसार होतो. याशिवाय तुम्हाला येथे स्वादिष्ट पदार्थांचा ही आस्वाद घेता येणार आहे.

कसोल
जानिए कसोल घूमने की 6 वजहें... - why you should visit to kasol in ...

नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हिमाचल प्रदेश आपल्या सौंदर्यासाठी देश आणि जगात प्रसिद्ध आहे. या राज्यात पाहण्यासारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत, पण कसोलचे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर ही जागा तुमच्यासाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. मार्च ते जून हा महिना येथे फिरण्यासाठी योग्य आहे. येथे तुम्हाला कमी पैशात खाण्यासाठी, राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी वाहतूक सहज मिळेल.

कूर्ग

कूर्ग में जाने के लिए 18 जगहें जो अविश्वसनीय रूप से शानदार हैं
उन्हाळ्यात कूर्ग देखील फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण सिद्ध होईल. दरवर्षी या ऋतूत अनेक जण येथे येतात. हे भारतातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. इथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार सुंदर धबधबे, हिरवळ आणि चहाच्या बागांचा आनंद घेऊ शकता.

Share This News

Related Post

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

Posted by - June 21, 2022 0
मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली…

पुणे : धानोरी येथे घरामधे लागलेल्या आगीत दोन सिलेंडर फुटल्याची घटना ; जखमी नाही

Posted by - September 24, 2022 0
पुणे – आज सकाळी धानोरी, लक्ष्मीनगर, स.न. 81/82 या ठिकाणी एका घरामधे आग लागल्याची वर्दि दलाकडे मिळाली असता धानोरी अग्निशमन…

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज…

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली

Posted by - May 30, 2022 0
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *