परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे

665 0

मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे शिवाजीनगर येथील कामांसंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला आज मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.

श्री. भुसे म्हणाले की, शिवाजीनगर येथील एसटीचे बसस्थानक मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडी येथील शासकीय दुग्ध योजनेच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर बसस्थानकाची जागा मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत महामेट्रोला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली असून यासाठी महामंडळ आणि महामेट्रो यामध्ये करार झाला आहे. येथील स्थानिक रहिवाशांसाठी वाकडेवाडी येथून डिसेंबर 2019 पासून बसस्थानक आणि आगार सुरळीत चालू असून जुन्या पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेस सुरु आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी ‘जुने शिवाजीनगर’ बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक तयार करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात 3 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक झाली असून आता पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचे, मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - March 10, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी न मिळाल्यामुळे एका बदली हंगामी रोजंदारीवरील पीएमपी…
Nilesh Lanke

Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी

Posted by - March 14, 2024 0
पुणे : आज पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल झाले आहेत.…
Pune News

युवा उद्योजक पुनीत बालन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने केले अभिवादन

Posted by - April 14, 2024 0
पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुणे…

खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं घेतला पेट; पुण्यातील कार्यक्रमातील घटना

Posted by - January 15, 2023 0
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली…
Pankaja Munde

Pankaja Munde : तिकीट मिळताच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ सूचक इशारा

Posted by - March 14, 2024 0
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *