TOP POLITICAL INFO: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘असे’ नेते ज्यांना कायमच मुख्यमंत्रीपदानं दिली हुलकावणी दिलीय

1484 0

Edited by Sanket Deshpande: मी मुख्यमंत्री झालो तर… तुमच्या माझ्यासह अनेकांनी शाळेत असताना कल्पनाविस्तार निबंध प्रकारामध्ये हा निबंध लिहला असेल राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न असतं पण आपल्या राज्याच्या राजकारणात असे काही नेते होऊन गेले की त्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी अनेकदा चर्चेत आली मात्र प्रत्येक वेळी मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली हे नेते नेमके कोण आहेत पाहुयात आजच्या TOP POLITICAL INFO मध्ये

अगदी समाजवादी चळवळीतील नेत्यांपासून अलीकडच्या राजकारणापर्यंत अनेक नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येतात मात्र काही कारणाने अथवा राजकीय समीकरणांमूळ अनेक नेते केवळ चर्चेतले मुख्यमंत्री राहतात असे कोणते नेते आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

एस एम जोशी : श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशीहे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते.

वसंत साठे : 1972 मध्ये ते अकोला मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आले. त्यानंतर आलेल्या आणिबाणीच्या काळात ते इंदिरा गांधीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते

राजारामबापू पाटील : राजारामबापू पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील सांगली तालुक्यातील वाळवा येथील कासेगाव येथे झाला . त्यांचे शिक्षण एलएल. बी. पर्यंत होते त्यांनी 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत काम केले. 1957 मध्ये सांगली जिल्हा समितीचे सचिव आणि 1959-60 मध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1952 ते 1962 पर्यंत ते दक्षिण सातारा जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष होते. आमदार, मंत्री म्हणून देखील राजाराम पाटील यांनी काम केलं होतं

यशवंतराव मोहिते : यशवंतराव मोहित्यांना इंदिरा गांधी यांनी सांगितले, “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा”. शेतकरी कामगार पक्षात जडणघडण झालेले मोहिते इंदिरा गांधींना म्हणाले महाराष्ट्रात एकदा धनाजी संताजीची दुही झाली.त्याचे परिणाम सगळ्या मराठी मुलुखाला भोगावे लागले. आता तसं होणार नाही जे खुद्द इंदिरा गांधी यांच्याकडून आलेली ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते मात्र एकमेव होते.

सुधीर जोशी : सुधीर जोशी यांची ओळख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू अशी होती. शिवसेना पक्ष संघटनेमध्ये सुधीर जोशींची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून सुधीर जोशी हे परिचित होते. यासोबतच ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. 1995-99 या काळात त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे याच वेळी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं मात्र ही संधी मनोहर जोशी यांना मिळाली

सुरेश जैन : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून सुरेश जैन ओळखले जातात आपल्या राजकीय कारकिर्दीत विक्रमी नऊ वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत.

डॉ पतंगराव कदम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातलं मुरब्बी व्यक्तिमत्व पतंगराव कदम यांची ओळख 1999,2003,2004, 2008, 2009 असं सलग 5 वेळा पतंगराव कदम यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आला मात्र ते कायमच चर्चेतले मुख्यमंत्री राहिले.

गोपीनाथ मुंडे: महाराष्ट्रात भाजपाला काळा काळात पोहोचवण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोलाचा वाटा होता 1995 ते 99 या काळात राज्यातील युती सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले पुढे अनेक वर्ष विरोधी बाकावर काम केलेल्या मुंडेंनी 2009 आणि 2014 असं दोन वेळा बीड लोकसभेचे प्रतिनिधित्व केला त्यानंतर 2014 मध्ये भाजपाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा नाव राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं मात्र बहुदा ही नियतीलाच मान्य नसावं 3 जून 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं

आर आर पाटील : आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून राज्यात काम पाहिलं 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून सुद्धा काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद गेल्यानं आर आर पाटील यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली

विजयसिंह मोहिते पाटील: राज्याच्या राजकारणात दादा म्हणून ओळखले जाणारे विजयसिंह मोहिते-पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. १९८० ते २००९ दरम्यान विजयसिंह मोहिते माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून गेले होते.

आता अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव देखील मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असून हे दोन राज्यातील बडे नेते मुख्यमंत्री होणार की चर्चेतलेच मुख्यमंत्री राहणार हे पाहण्यासाठी मात्र आगामी काळाची वाट पाहावी लागणार आहे.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्याचा होणार एकत्रित विकास आराखडा; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक

Posted by - December 25, 2022 0
पुणे: शहर आणि ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीकोनातून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतात. त्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाढलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन

Posted by - July 11, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाढलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून…
Deepak Kesarkar

Teacher Recruitment : शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा; राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती

Posted by - June 26, 2023 0
कोल्हापूर : शिक्षकांसाठी (Teacher Recruitment) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा करत राज्यात…
Lalit Patil

Lalit Patil : ‘ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो’, ‘या’ आमदाराने केला थेट आरोप

Posted by - October 23, 2023 0
पुणे : ‘ललित पाटीलचा (Lalit Patil) कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर कोणताही…
Eknath And Uddhav

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ दोन शिलेदारांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - June 3, 2023 0
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *