पुण्याच्या राजकारणातील संयमी व्यक्तिमत्त्व ‘अनिल शिरोळे’…

492 0

पुणे : पद्माकर गुलाबराव शिरोळे उर्फ अनिल शिरोळे पुणे शहराच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि चारित्र्यवान नेता… 2019 मध्ये अनिल शिरोळेंची खासदारकी तर संपली खरी मात्र अनिलराव आजही प्रत्येक पुणेकरांच्या मनामध्ये घर करून बसलेत.

1970 मध्ये पतित पावन संघटनेच्या माध्यमातून अनिल शिरोळे यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे 1972 मध्ये विद्यार्थी विंग्जचे सचिव बनले . आणीबाणीच्या काळात 1975 मध्ये एक वर्षांचा तुरुंगवास देखील भोगला. त्यानंतर 1992 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा…

See the source image

पुढे त्यांनी पुणे महानगरपालिकेत भाजपाचे नगरसेवक म्हणून कार्यभार पाहिला … याच दरम्यान स्थायी समिती सदस्य पदाबरोबरच पुणे मनपाचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील कार्यभार पाहिला… 2000 मध्ये पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, विरोधी पक्षनेते अशी एका मागोमाग एक राजकीय पद उपभोगत असताना राजकारणात असूनही आपला शांत स्वभाव आणि चारित्र्य संपन्नता त्यांनी जपली.

2009 मध्ये पण त्यांनी मतमोजणी केंद्रावरच कलमाडी यांना आलिंगन देऊन त्यांचे अभिनंदन केले होते. पुढे 2014 मध्ये अनिल शिरोळे यांनी भाजपाच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली, आणि काँग्रेसचे मातब्बर नेते असणाऱ्या विश्वजीत कदम यांना तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत करत अनिल शिरोळे लोकसभेत निवडून गेले.

See the source image

खासदार असताना अनिल शिरोळे यांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक विकासात्मक योजना आणल्या… त्यासाठीचा पाठपुरावा देखील केला . पुढे 2019 मध्ये विजयाची खात्री असताना पक्ष आणि विद्यमान खासदार असून सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारत पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी गिरीश बापट यांना घरी जाऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला आणि अभिनंदन केलं.

राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी सुरू असणारी रस्सीखेच आणि तिकीट नाकारल्यानंतर होणारी नाराजी ,पक्ष नेतृत्वावर होणारे आरोप या सगळ्यापासून लांब राहत अनिलरावांनी आजपर्यंत कधीच नाराजी व्यक्त कोणतीही तक्रार केली नाही. असा हा चारित्र्यसंपन्न नेता आज वयाच्या त्र्याहत्तरीत प्रवेश करतोय त्यांना TOP NEWS मराठीच्या वतीने वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा …

– संकेत देशपांडे
रिपोर्टर, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

भारत इतिहास संशोधक मंडळ : शिवकालीन दुर्मीळ गोष्टींचा खजिना

Posted by - January 8, 2023 0
पुण्याच्या भरत नाट्य मंदिराशेजारी असलेली भारत इतिहास संशोधक मंडळाची वास्तू म्हणजे पुण्याचा मानबिंदू ! 7 जुलै 1910 रोजी इतिहासाचार्य वि.…

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराईतांवर कारवाईचा धडाका कायम ; अजय विटकर आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - October 1, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्का अंतर्गत 98 कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम ; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने खुनी हल्ला

Posted by - January 17, 2023 0
पुणे : कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यामध्ये धुडगूस घातला आहे. शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने…
Ahmednagar News

Ahmednagar News : 32 वर्ष निवडणूक लढला पण प्रत्येकवेळी पडला तरी जिद्द नाही हरला अखेर 51 व्या वर्षी सरपंच बनला

Posted by - November 8, 2023 0
अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या…

प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्याची राहुल गांधींना खोड आहे – जगदिश मुळीक

Posted by - November 18, 2022 0
पुणे : राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अत्यंत घृणास्पद वक्तव्यानंतर आज पुण्यात काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या जवळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *