टोल वाचवण्यासाठी जुन्या पुणे- मुंबई मार्गावरून जाताय ? मग बातमी तुमच्यासाठी आहे

5107 0

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता या दोन्ही मार्गावर आज १ एप्रिलपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. जुन्या महामार्गावरील टोल देखील वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे.

आता पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे कोणत्याही मार्गाने जा, आजपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. देशात सर्वाधिक टोल पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचा आहे, त्यातही आता 1 एप्रिलापासून वाढ झाली. आता जुन्या महामार्गावरील टोल वाढवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. म्हणजेच पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका शासनाने दिला आहे. या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरु झाल्यानंतर या मार्गावर टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी वाढ 2020 मध्ये झाली होती. आता 1 एप्रिल 2023 पासून टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फक्त द्रुतगती मार्गावरच नाही तर जुन्या महामार्गवर देखील करण्यात आली आहे.

जुन्या महामार्गावरील दरवाढ अशी

फास्टटॅग नसले तर टोल दर

कार- जुना दर – 135 नवा दर- 156
हलके वाहन: जुना दर- 240 नवा दर- 277
ट्रक/बस : जुना दर -476 नवा दर- 551
अवजड वाहन : जुना दर -1023 नवा दर- 1184

फास्ट टॅग असले तर दर

कार : जुना दर – 41 आता 47
हलके वाहन : जुना दर – 72 आता 83
ट्रक/बस : जुना दर -143 आता 165
अवजड वाहन : जुना दर – 307 आता 355

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चक्रवाढ पद्धतीने दर तीन वर्षांनी वाढ होते. 2017 नंतर 2020 मध्ये वाढ झाली. आता 2023 मध्ये वाढ झाली आहे

एक्स्प्रेस वे वरील दरवाढ अशी

चार चाकी वाहन, जुना दर – 270 एप्रिल 2023 पासून नवीन दर-320

टेम्पो, जुना दर – 430 एप्रिल 2023 पासून नवीन दर-495

ट्रक, जुना दर – 580 एप्रिल 2023 पासून नवीन दर-685

बस, जुना दर -797 एप्रिल 2023 पासून नवीन दर-940

थ्री एक्सल वाहन, जुना दर -1380 एप्रिल 2023 पासून नवीन दर-1630

एम एक्सल वाहन, जुना दर -1835 एप्रिल 2023 पासून नवीन दर-2165

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणुक : “आम्ही गुलाम नाही हे कसब्याची जनता यंदा दाखवून देतील…!”- माजी क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - February 21, 2023 0
पुणे : गेली ३० वर्षे भाजपाची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदार संघातील जनता यंदा ‘आम्ही गुलाम नाही’ हे दाखवून…

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

Posted by - June 9, 2024 0
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत.…
Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun…

BIG NEWS : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

Posted by - October 10, 2022 0
पिंपरी चिंचवड : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसा भांडवल नसल्या कारणाने, द…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *