#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

526 0

भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा भारतापेक्षा कित्येक पटीनं जास्त हाहाकार हा जगभरात माजला होता. पंतप्रधानांनी कोरोनाला थोपवण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी संध्याकाळी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा अचानक पंतप्रधानांनी केली आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी वूहान शहरांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याची माहिती दिली होती. 29 जानेवारी 2020 ला भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. तर 11 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात पहिला रुग्ण हा पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला होता.

भारतातील एकंदरीत परिस्थिती पाहता मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील हा एक वाईट आठवणीतला काळच राहील.

Share This News

Related Post

#Germany : जर्मनीत चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार; 7 ठार 24 जखमी

Posted by - March 10, 2023 0
जर्मनी : जर्मनीच्या हॅमबर्ग या शहरांमध्ये एका चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही…
Death of Trekker

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

Posted by - August 9, 2023 0
नाशिक : सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठ्या (Death of Trekker) प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पावसाळी…

PUNE : 31 डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल; ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम, वाचा कसे आहेत बदल

Posted by - December 30, 2022 0
पुणे : वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची…

‘गृहमंत्री उत्तम काम करतात’, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
मुंबई- भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा उफाळून आली आहे.…

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली धक्कादायक माहिती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police)दोन दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *