वृत्तपत्रात बदनामीची धमकी; खंडणीची वसुली; महिला संपादकासह चौघा तोतया पत्रकारांना अटक

613 0

पुणे : पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या एका महिला संपादकासह तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री केली जाते. तुमची पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करतो. अशी धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या महिला संपादकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघा तोतया पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये प्रमोद साळुंखे,वाजिद सय्यद, मंगेश तांबे, लक्ष्मण सिंह तवर अशी अटक केलेल्यांची नावे असून योगेश नागपुरे आणि संजीवनी कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 42 वर्षीय व्यावसायिक यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनी मध्ये एक गोदाम असून प्रमोद साळुंखे वाजिद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मण सिंह तवर हे देखील होते.

यावेळी तुम्ही गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करून दोन नंबरचा धंदा करता. यापूर्वी गुटख्याची विक्री करून खूप पैसा कमावला. आता पेपर मध्ये बातमी लावतो. तसेच खानदानाचा खून करतो अशी धमकी देखील या तोतया पत्रकारांनी दिल्याचे समजते. फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. तसेच गोदामाच्या बाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला. असे देखील फिर्यादी यांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्री ही बाब मुंडवा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला असता, चौघा पत्रकारांना या पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना मातृशोक

Posted by - April 10, 2023 0
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विनोद तावडे यांच्या मातोश्री राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या मातोश्री…
Test Team India

India’s Squads for West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कोणाला मिळाला डच्चू तर कोणाला मिळाली संधी?

Posted by - June 23, 2023 0
मुंबई : भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India’s squads for West Indies) जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर…

हीच का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ?

Posted by - April 1, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासळत चालला असून जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक हेवेदावे यांनाचं सत्ताधारी विरोधक जास्त प्राधान्य देत असल्याचं…
Jail

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

#LIFESTYLE : बॉडी डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा पर्याय ! शरीर आणि मनही राहील तंदुरुस्त…

Posted by - February 13, 2023 0
तुमचं शरीर किती निरोगी आहे. यावरच तुमचं मन आणि मेंदू काम करत असते. जर तुमचं शरीर निरोगी नसेल तर तुम्हाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *