UDAY SAMANT : मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? नाणार रिफायनरीची 3.5 लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या !

256 0

मुंबई : फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे.

केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग मविआच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही ? दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळविले नाही ? अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील.

यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक 2014 ते 2019 या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात आली होती. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

असाच प्रकार गिफ्ट सिटीच्या बाबतीत झाला. नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालिन संपुआ सरकारकडून परवानगी आणली. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी परवानगी आणली नाही आणि मग प्रकल्प गुजरातमध्ये गेला की, ओरड सुरू गेली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता. गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची.

आता राज्यात पुन्हा तीच युती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटलांनी फार काळजी करण्याची गरज नाही. आता वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, अशी विनंती सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

Share This News

Related Post

राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - October 1, 2022 0
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही.…

राष्ट्रपतीपद निवडणूक ; शरद पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधीपक्षांना धक्का

Posted by - June 14, 2022 0
नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…
Kolhapur News

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Posted by - November 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उसाचे दर वाढून मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या…

“अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण…!”; मंत्री शंभुराज देसाईंची पवारांवर टीका

Posted by - December 31, 2022 0
सातारा : “संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा…!”, या वक्तव्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सत्ताधारांनी कडाडून टीका सुरू केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *