चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट; काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

209 0

पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली व प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने उर्वरीत कामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा-मुंबई साठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ लेन उपलब्ध आहेत.

बेंगळुरू मुंबई हायवेवरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) व माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. श्रृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजे कडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतूकीस खुला करण्यात आलेला आहे. बावधन कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ चे काम प्रगतीत असून दिड महिन्यात पूर्ण करण्यात येईल.

कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरीत काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल. एन डी ए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीत असून पुढील १० दिवसात पूर्ण होईल. मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत असून पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल. मुळशी ते सातारा रॅम्प चे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून त्यावरून मुळशी वरुन येणारी वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळविण्यात आली आहे.

मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरीत भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात २० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महानगर पालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आलेली आहे. उर्वरीत काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशी कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी श्री. कदम यांनी दिली.

एनडीए सर्कल सुशोभीकरणास लवकरच प्रारंभ
कोथरुड- एनडीए रोड- मुळशी व एनडीए – मुंबई च्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका व एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेवून चौकाचे सुशोभीकरण करणेविषयी सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांचेकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीए कडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही श्री. कदम यांनी सांगितले.

Share This News

Related Post

PUNE CRIME : खडकी भागात दहशत माजवणाऱ्या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 106 वी काम कारवाई

Posted by - November 7, 2022 0
पुणे : खडकी भागामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार सलमान नासिर शेख आणि त्याच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

Posted by - April 24, 2022 0
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला वहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार…

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या पिकअपची कंटेनरला धडक १ ठार, दोन जखमी

Posted by - April 18, 2022 0
तळेगाव- कंटेनरला पीकअप गाडीने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात…

रिलायन्स आणि युएईच्या ताजीझमध्ये 2अब्ज डॉलर शेअरहोल्डर करारावर स्वाक्षरी

Posted by - April 27, 2022 0
अबू धाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी RSC लिमिटेड (ताजीझ) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी ताजीझ इडिसी आणि PVC प्रकल्पासाठी औपचारिक…

BIG BREAKING : ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने VIDEO

Posted by - November 15, 2022 0
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाला आहे. ठाण्याच्या किसन नगरमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *