सुज्ञ पुणेकर नागरिकांनो कृपया इकडे लक्ष द्या..! बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीचा ‘काउंटडाऊन फलक’ पुण्यात चर्चेचा विषय

2932 0

पुणे : बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीने पुण्यामध्ये मोठे आंदोलन केले. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन बारा डिसेंबर पर्यंत हा बंद मागे घेण्यात आला. त्यामुळेच आता बारा डिसेंबरचा बंद होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेला शब्द विसरू नये ही आठवण करून देण्याच्या हेतून या समितीने एक फलक पुणे आरटीओच्या बाहेर लावला आहे.

28 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. याचा फार मोठा फटका पुणेकरांना नक्कीच बसला. कारण रिक्षाने पुकारलेला संप यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनानं 12 डिसेंबरचा संप करण्याची वेळ येणार नाही असा आश्वासन दिल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आठवण करून देण्याच्या दृष्टीने हा काउंट डाऊन फलक इथे लावण्यात आला आहे.

यावर लिहिल आहे की, 28 नोव्हेंबर 2022 ला आम्ही रिक्षा चालकांनी बंद पुकारला होता. शासन आणि बेकायदा बाईक टॅक्सी पूर्णपणे बंद करेल, असं आश्वासन दिल्यावर पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेऊन आमचे बेमुदत रिक्षा बंदचे चक्काजाम आंदोलन मागे घेतलं. त्याच दिवशी प्रशासना समोर बाई टॅक्सी विरोधात 12 डिसेंबर पासून आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमचे आंदोलन अजून तीव्रतेने चालू होईल असं सांगितलं होतं. या पुढील आंदोलनास प्रशासन जबाबदार राहील याची पुणेकरांनी नोंद घ्यावी असं या फलकावर लिहून प्रशासनाला रोज एक आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

Share This News

Related Post

Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

Posted by - June 20, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…
BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष…

अजब लग्नाची गजब कहाणी ! 24 वर्षाची तरुणी करणार आत्मविवाह !

Posted by - June 2, 2022 0
वधू वराचे लग्न होते ही तर सामान्य गोष्ट आहे. यापूर्वी दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याची बातमी देखील तुम्ही वाचली असेल.…
Pune Crime

Pune Crime : पत्नीने केलेल्या मारहाणीत पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

Posted by - November 24, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा…

पालखी सोहळ्यासाठी 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

Posted by - June 19, 2022 0
पुणे:- कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *