crime

#NASHIK : घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि मुलांनी वडिलांनाच संपवले; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

598 0

नाशिक : नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि दोन मुलांनी स्वतःच्या वडिलांनाच मारहाण करून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंदलगाव आहे. मनमाड आणि मालेगाव या दोन शहरांच्या मध्ये हे कुंदलगाव असून या गावात राहणाऱ्या पूनमचंद शिवाजी पवार यांची पत्नी आणि दोन मुलांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. पूनमचंद पवार यांच्या पुतणीचा लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यामध्ये पुनमचंद यांची पत्नी सुनीता आणि दोन मुलं भूषण आणि कृष्णा हे उपस्थित होते. पण लग्नामध्ये स्वतः पुनमचंद हे उपस्थित नसल्यामुळे त्यांना सातत्याने, ‘ते का आले नाहीत ?’ अशी विचारणा घरातून होत होती.

दरम्यान पूनमचंद जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणी मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुनमचंद यांच्या भावाला ही माहिती दिली. पुनमचंद यांचे भाऊ घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ असे सांगितले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

Posted by - March 24, 2023 0
भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा…

पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - August 29, 2022 0
पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून…

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला पूर्वनियोजित;जितेंद्र आव्हाडांचा दावा

Posted by - April 10, 2022 0
शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…
Punit Balan

‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना 3 हजार किटचे वाटप

Posted by - June 16, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिस बांधवांना ‘पुनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *