उद मांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास ; मुळशी वन विभागाकडून संरक्षण

606 0

पुणे : हिंजेवाडी फेस टू मध्ये एमबीसी कॉर्ड्रेन कंपनी परिसरातील मागील काही दिवसांपासून दुर्मिळ प्रजातीचे उदमांजर आढळून येत होते. कंपनीच्या कर्मचारी यांनी वनविभागाशी संपर्क साधला असता, वनरक्षक श्री पांडुरंग कोपणार यांनी इतर वन कर्मचारी यांच्यासह जागेवर जाऊन ऊद मांजर सुरक्षितपणे ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र कार्यालयात दाखल केले असता,सदर ठिकाणी उदमांजराची प्राथमिक तपासणी करण्यात येऊन मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यावेळी वनपाल संजय अहिरराव, मल्लिनाथ हिरेमठ, कल्याणी मच्छा तसेच वनरक्षक आणि वन कर्मचारी उपस्थित होते. उदमांजर हा प्राणी भारतासह इतरही आशियाई देशात आढळून येत असून त्यास एशियन पाम सिवेट नावाने ओळखले जाते. स्थानिक भाषेत उद ,उदबिल्ला,म्हसण्याउद या नावाने देखील या प्रजातीस ओळखले जाते. मूळ सपाट प्रदेश राहणारा प्राणी असला तरी वाळवंट शुष्क प्रदेशातही हा प्राणी आढळतो. हा प्राणी मिश्राहारी असून फळे फुले याबरोबर खेकडी, मासे,उंदीर, बेडूक, किडे, पाली खातो सरोवर तलाव नद्या कालवे इत्यादींच्या काठावर जमिनीत बीळ करून राहतो. रंग काळसर तांबूस तपकिरी असून एकट्याने राहणारा हा प्राणी आहे. याचे वजन ७ ते ११ किलो पर्यंत असून लांबी 65 ते 75 सेंटीमीटर असते.

या प्राण्याबद्दल अनेक प्रचलित अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले. उदमांजर या प्राण्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण प्राप्त असून शेड्युल दोन मधील पार्ट दोन मध्ये समाविष्ट आहे या प्राण्याची छेडछाड करणे, जवळ बाळगणे तस्करी करणे शिकार करणे हा अपराध असून त्यास तीन ते सात वर्षे पर्यंत कारावास तसेच पंचवीस हजार पर्यंत दंड होऊ शकतो वन्यजीवांशी संबंधित कोणतीही घटना आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा तसेच 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे.

Share This News

Related Post

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

Posted by - April 26, 2022 0
नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : …तर आज संध्याकाळपासून पाणी पुन्हा बंद; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Posted by - November 1, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न हा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस…
Suraj Kalbhor

पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - June 4, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सूरज काळभोर असे मृत तरुणाचे…

वंचित बहुजन युवा आघाडीचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा !

Posted by - September 14, 2022 0
पुणे – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे…

कालीचरण महाराज बरळले ! डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा… VIDEO

Posted by - December 15, 2022 0
अहमदनगर : अहमदनगर येथे 14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला. या मोर्चाला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *