#ACCIDENT : ट्रकची शाळकरी मुलांच्या ऑटोला जबर धडक ; चार मुलांचा मृत्यू, रिक्षा चालकासह ७ मुलं गंभीर जखमी

4848 0

छत्तीसगड : छत्तीसगड मधील कांकेर येथे गुरुवारी दुपारी एका भीषण अपघातामध्ये बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका ट्रकने शाळकरी मुलांच्या ऑटोला जबर धडक दिली. या धडकेमध्ये चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा मुलं आणि रिक्षाचालक बाल-बाल बचावले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी छत्तीसगड मधील कांकेर येथे हा अपघात झाला. ट्रकने ऑटोला जबर धडक दिली होती. या ऑटोमध्ये बारा मुलं घरी परतत होती. अशी माहिती समजते आहे. यात रुद्रदेव (वय वर्ष ७), रुद्राक्षी (वय वर्षे ६), इंसान मांडवी (वय वर्ष ४) आणि मानव साहू (वय वर्ष ६) या चार मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि ऑटो चालकासह सात मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

Share This News

Related Post

लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी अक्षरशः तुडवले

Posted by - March 30, 2022 0
कोल्हापूर – गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका शिक्षकाला गावकऱ्यांनी बेदम चोप देऊन त्याला अक्षरशः तुडवून काढले. यावेळी एका…

चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

Posted by - May 3, 2022 0
पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा नांदेडमध्ये दुसरा बळी; दहावीतील विद्यार्थांने संपवले जीवन

Posted by - October 23, 2023 0
नांदेड : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्याचे वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणापायी आज नांदेडमध्ये दुसरा बळी गेला आहे. नायगाव तालुक्यातील…

BIG BREAKING : आकुर्डीतील अगरबत्ती कंपनीला भीषण आग; कंपनीलगत असलेल्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवले; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Posted by - December 6, 2022 0
पिंपरी-चिंचवड : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकरनगर आकुर्डी येथील एका अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आज…

“भाजप,मनसे हे आमचे जुने सहकारी,त्यांनी साधी विचारपूसही केली नाही…!” वाचा संजय राऊत यांनी ‘का’ केले असे ट्विट

Posted by - November 21, 2022 0
मुंबई : सुमारे तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांची स्वतः भेट घेऊन त्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *