#PUNE : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

311 0

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी श्री. पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 2, 2022 0
मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या…

ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि…

BIG NEWS : कोल्हापुरातील कणेरी मठातील धक्कादायक प्रकार ; शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू

Posted by - February 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील कणेरी मठ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे.…
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *