#PUNE : चांदणी चौकात वाहतूक कोंडी मोडीत काढली पण पादचाऱ्यांचं काय ? पादचाऱ्यांचा रोज होतोय जीवघेणा प्रवास

338 0

पुणे : शहरातील पश्चिम भागातील महत्त्वाचा असलेल्या चांदणी चौक मध्ये वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून चांदणी चौकातील बावधन ते कोथरूड, व मुळशी, पौड कडे जाणारा भाऊ चर्चित पूल पाडण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये पादचारी यांचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. आज या तिन्ही ठिकाणी जायचं असेल तर मागणी करून गेले सहा महिन्यात कोणताही स्काय वाक पूलची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतो.

पाषाण बावधन कडून येणाऱ्या नागरिकांना मुळशीकडे जाताना कोणतीही व्यवस्था करण्यात आलेले नसून, एक बायपास एक्सप्रेस हायवेला मोठे लोखंडी बॅरिगेड असल्यामुळे रस्ता क्रॉस करता येत नाही. याबाबत अनेक वेळा मागणी करूनही नॅशनल हायवे अथॉरिटी व पुणे मनपा याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. तसेच पाषाण बावधन कडून कोथरूडकडे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही फुटपाथची व्यवस्था केलेली नाही.

नागरिकांना वाहतुकी कोंडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तरी स्कायवॉकची व्यवस्था व कोथरूडकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी फूटपाथ व्यवस्था लोखंडी बॅरिगेट लावून करावी. अशी विनंती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी बाबा शिंदे यांनी केली आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

Posted by - February 10, 2022 0
पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा…

तुम्हाला माहित आहे का ? मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे ‘हे’ आहे कारण

Posted by - January 14, 2023 0
हिंदू सणासुदीला सामान्यपणे काळ्या रंगाचे कपडे वापरले जात नाहीत. कारण काळा रंग अशुभं असल्याचं मानलं जातं. मात्र हाच काळा रंग…

अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये मृदुंग दिंडीमध्ये होणार सहभागी

Posted by - October 8, 2022 0
आळंदी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज आळंदी दौरा आहे. आळंदी मधील मृदुंग ज्ञान गुरुकुल शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू , वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले ?

Posted by - April 5, 2023 0
बारामती तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले आणि त्यामुळे शेतकऱ्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *