राज्य सरकारच्या ‘या’ नव्या योजनेमुळे रस्ते अपघात होणार कमी ! काय आहे योजना

874 0

Edited by : Bageshree Parnerkar : शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वाढलेले अपघात कमी करण्यासाठी जिल्हा स्तरावर आता ‘जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना’ ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अधिपत्याखाली या योजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची कामं केली जाणार आहेत. रस्ता सुरक्षेच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या वार्षिक निधीतून 1% निधी मिळणार आहे. देशात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. दरवर्षी दीड लाख नागरिक रस्ते अपघातात जीव गमावतात. राज्यात देखील ही संख्या 14 हजार 800 एवढी आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. ही गंभीर बाब असून केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने 2025 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंच प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

‘जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना’ योजनेची अंमलबजावणी संबंधित जिल्ह्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेच्या निधीच नियंत्रण हे जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

Share This News

Related Post

Dispute

Dispute : दुचाकीचा धक्का लागल्यानं दोन गटांत तुफान राडा; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Posted by - June 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये तुफान राडा (Dispute) झाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकीचा धक्का लागल्यामुळे दोन गटांमध्ये…

पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

Posted by - December 7, 2022 0
पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने…

‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

Posted by - April 17, 2023 0
अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं…

कोरोनाची पुन्हा भीती : “चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?” अजित पवारांचा सभागृहात सवाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 21, 2022 0
हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष…

नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Posted by - October 8, 2022 0
मुंबई : नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *