कलाजगतातील झगमगता तारा निखळला; असा होता दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जीवनप्रवास

363 0

‘विक्रम गोखले (३० ऑक्टोबर, १९४७ – २६ नोव्हेंबर, २०२२) हे एक मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नाव. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे.

Image result for Vikram Gokhale HINDI MOVIE

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.घशाच्या त्रासामुळे त्यांनी २०१६ साली नाटकातील अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला होता. तेव्हा पासून ते नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देत होते.

See the source image

कौटुंबिक माहिती
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री म्ह्णून ओळखल्या जात होत्या. तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली गोखले आहे. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. कुटुंबातूनच अभिनयाचे बाळकडून मिळालेले विक्रम गोखले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट सुष्टिमध्ये त्यांनी अनेक अजरामर भूमिका तर केल्या आहेतच त्यासह हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी शानदार भूमिका साकारल्या आहेत.

पाहुयात त्यांचा कला जगतातील जीवनप्रवास

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके
एखादी तरी स्मितरेषा
कथा
कमला
कल्पवृक्ष कन्येसाठी
के दिल अभी भरा नही
खरं सांगायचं तर
छुपे रुस्तम
जावई माझा भला
दुसरा सामना
नकळत सारे घडले
पुत्र मानवाचा
बॅरिस्टर

See the source image
मकरंद राजाध्यक्ष
महासागर
मी माझ्या मुलांचा
संकेत मीलनाचा
समोरच्या घरात
सरगम
स्वामी

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट
मॅरेथॉन जिंदगी (२०१७)
आघात (२०१० दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट)
आधारस्तंभ
आम्ही बोलतो मराठी
कळत नकळत (१९९१)
ज्योतिबाचा नवस
दरोडेखोर (१९८०)
दुसरी गोष्ट (२०१४)
दे दणादण
नटसम्राट (२०१५)
भिंगरी (१९७७)
महानंदा (१९८५)
माहेरची साडी (१९९१)
लपंडाव (१९९३)
वजीर
वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३)
वासुदेव बळवंत फडके
सिद्धान्त

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट
अकेला (१९९१)
अग्निपथ (१९९०)
अधर्म (१९९२)
आंदोलन (१९९५)
इन्साफ (१९८७)
ईश्वर (१९८९)
कैद में है बुलबुल (१९९२)
क्रोध (१९९०)
खुदा गवाह (१९९२)
घर आया मेरा परदेसी (१९९३)
चँपियन (२०००)
जख़मों का हिसाब (१९९३)
जज़बात (१९९४)
जय बाबा अमरनाथ (१९८१)
तडीपार (१९९५)
तुम बिन (२००१)
थोडासा रूमानी हो जाय (१९९०)
धरम संकट (१९९१)
परवाना (१९७१)
प्रेमबंधन (१९७९)
फलक द स्काय (१९८८)
बदमाश (१९९८)
बलवान (१९९२)
मुक्ता (१९९४)
यही है जिंदगी (१९७७)
याद रखेगी दुनिया (१९९२)
लाईफ पार्टनर (२००९)
लाड़ला (१९९४)
वजीर (१९९४)
श्याम घनश्याम (१९९८)
सती नाग कन्या (१९८३)
सलीम लंगडे पे मत रो (१९८९)
स्वर्ग नरक (१९७८)
हम दिल दे चुके सनम (१९९९)
हसते हसते (१९९८)
हे राम (२०००)
दूरचित्रवाणी मालिका
अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
अल्पविराम
उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
जीवनसाथी
द्विधाता
मेरा नाम करेगा रोशन
या सुखांनो या (झी मराठी)
विरुद्ध
संजीवनी (२००२)
सिंहासन (२०१३)

पुरस्कार

Image result for Vikram Gokhale MARATHI
’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार
हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७)
पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८)
चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

Share This News

Related Post

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

Posted by - August 3, 2022 0
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच…

पुणे जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

Posted by - November 3, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा…

CHITRA WAGH : “संजय राठोड प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला तेव्हा का आवाज उठवला नाही ? मी लढायचे कधीच सोडणार नाही…!”

Posted by - December 16, 2022 0
सांगली : सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *