“शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत…! – भास्कर जाधव

388 0

पुणे : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिरवाळ भाषा वापरुन सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज भास्कर जाधव यांचा डेक्कन पोलीस स्टेशन ने जवाब नोंदविला.पुणे कोर्टाकडून भास्कर जाधव यांना हंगामी अटकपुर्व जामिन मंजूर मिळाला. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भास्कर जाधव म्हणाले,शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यात काही तथ्य नाही असं यावेळी भास्कर जाधव म्हणाले.

पोलीस दडपणाखाली आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. भास्कर जाधव म्हणाले, कायद्याचा सन्मान राखत आज डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलो. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. हे सरकार सगळे नियम पायदळी तुडवत आहेत. मविआ सरकारने चांगले काम करत अनेक प्रकल्प आणले. कोरोना सामना करत काम केलं. मात्र केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारच झालं मात्र आता मविआ सरकारच्या काळात आलेले अनेक प्रकल्प आता जात आहेत. एकनाथ शिंदे म्हटले माझ्यामागे महाशक्ति आहे पण आता महाराष्ट् खिळखीळ करण्याचं काम सुरू आहे. असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, देवेंद्र फडणवीस बोलण्यात फार चलाख आहेत. यांच्या मध्यस्थीमुळे रवी राणा बच्चू कडू याचे वाद मिटला त्याचबरोबर रवी राणा बच्चू कडू याचे वाद होत राहो याच शुभेच्छा असंही ते म्हणालेत.

भास्कर जाधव पत्रकारावर का भडकले ?

भास्कर जाधव यांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला तुम्ही एकनाथ शिंदे गटात जाणार होतात. पण स्वतः मुख्यमंत्री यांनी तुम्हाला तिथे येण्यास नकार दिला’ त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही कधी एकनाथ शिंदेंना भेटला ? मला महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही भेटत आहात जे हे असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांना तुम्ही भेटून आला का? त्यांनी तुम्हाला हे सांगितले का? काय प्रश्न विचारत आहात ? असे भास्कर जाधव म्हणाले.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री…
Jalgaon Suicide

Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 25, 2023 0
जळगाव : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या (Jalgaon Suicide)…

राष्ट्रपती निवडणूक : निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य-मुख्य निवडणूक आयुक्त

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष…
Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Posted by - May 7, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआयएमएल विभागाच्या प्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *