जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हस्ते

464 0

पुणे : रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होईल. कोथरूड-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला आहे.

जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. ‘जनकल्याण सेवा फाउंडेशन’चे संचालक सीए महेश लेले, आणि ‘डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी’चे कोषाध्यक्ष सीए माधव (अभय) माटे हेही या वेळी उपस्थित होते. या तीन संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ची निर्मिती केली आहे. ‘सेवा भवन’ ही वास्तू सात मजली असून एकूण बांधकाम २७ हजार चौरसफुटांचे आहे.

‘सेवा भवन’ या प्रकल्पामध्ये एका मजल्यावर अल्प शुल्कातील डायलेसिस सेंटर चालवले जाणार आहे. अन्य तीन मजल्यांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्प शुल्कातील उत्तम निवास व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था उपलब्ध असेल. एका मजल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मार्गदर्शन तसेच माहिती केंद्र चालवले जाणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर ‘जनकल्याण समिती’तर्फे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाणार आहे. ‘जनकल्याण समिती’च्या तसेच महाराष्ट्रातील अन्य सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येथे अद्ययावत सभागृह तयार करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. साताळकर यांनी दिली.

‘सेवा भवन’चे उद्घाटन शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होईल. कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीजवळ असलेल्या गांधी लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मोहनजी भागवत यांचे यावेळी मुख्य भाषण होईल. पुणेकरांनी डॉ. भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. साताळकर यांनी केले. ‘जनकल्याण समिती’च्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणार्‍या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते कार्यक्रमात केले जाणार आहे.

Share This News

Related Post

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Posted by - June 8, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज…

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला “हा” मोठा निर्णय

Posted by - March 5, 2022 0
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने…
Dagdusheth Ganapati

Dagdusheth Ganapati : ‘दगडूशेठ’ बाप्पांसमोर 36 हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

Posted by - September 20, 2023 0
पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी…

#Travel Diary : कमी बजेटमध्ये संस्मरणीय सुट्ट्या घालवायच्या असतील तर ही पर्यटन स्थळे आहेत परफेक्ट

Posted by - March 21, 2023 0
उन्हाळी पर्यटनस्थळे : मार्च महिना येताच उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीचे प्लॅनिंग करू लागतात. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *