पुणे पोलीस हायटेक होणार ! सायबर तपासासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

247 0

पुणे : राज्यात आणि देशभरात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवून लाखो करोडोंचा गंडा सामान्य माणसांपासून ते अगदी महत्त्वाच्या लोकांपर्यंत देखील घालण्यात यशस्वी होत आहेत. वाढती बेरोजगारी पाहता अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी देखील आपल्या ज्ञानाचा चुकीचा वापर करत असल्याचा देखील निष्पन्न झाल आहे. मात्र आता सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी सायबर पोलीस ठाण्यामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ देखील नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

सीसीटीएनएस प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येते आहे. या प्रणालीचे अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच सीसीटीएनएस ०.२ लॉन्च करण्यात येणार असून ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची देखील दखल घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली.

पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रथमच माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी सायबर क्राईम, वाहतूक प्रश्न या विषयांवर थेट चर्चा केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अमुलाग्र बदल करण्यात येत असून वाहतूक पोलिसांच्या नियोजनाबाबत मोठे फेरबदल करण्याचा विचार असल्याच देखील यावेळी त्यांनी म्हटल आहे. तर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व कठोर कलमांचा वापर करण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यावर देखील भर दिला जाणार असल्याच नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी म्हंटले आहे.

Share This News

Related Post

Satara Crime

Satara Crime : साताऱ्यात तलावात उडी घेणाऱ्या ‘त्या’ प्रेमीयुगुलाला शोधण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सला यश

Posted by - October 2, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime) तालुक्यातील कोंडवे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने तलावात उडी मारून…

पुणे : बालगंधर्व चौक येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता झाला निसरडा; अपघात टळले

Posted by - December 23, 2022 0
पुणे : आज शुक्रवारी बालगंधर्व चौकात मोठ्या प्रमाणावर तेल सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी माती टाकून धोका…

‘….. नाहीतर तुम्हाला महाग जाईल’, पोलिसांना दम भरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Posted by - April 12, 2023 0
गाडीला काळ्या काचा लावून पोलिसांना दमबाजी करणार्‍या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन…

#Netflix : या आठवड्यात OTT वर येत आहेत गुलमोहर आणि ताजसह हे चित्रपट आणि वेब सीरिज; लिस्ट पहाचं

Posted by - March 1, 2023 0
ओटीटी चित्रपट आणि वेब सीरिज : 7 फेब्रुवारी ते 5 मार्च मार्चला सुरुवात झाली असून ओटीटी स्पेसमध्ये या आठवड्यात अनेक…

माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना उच्च न्यायालयाचा दणका

Posted by - February 3, 2024 0
उषा काकडे यांचे सख्खे भाऊ बांधकाम व्यवसाईक युवराज ढमाले यांना त्यांचे सख्खे मेव्हणे संजय काकडे व बहीण उषा काकडे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *