महावितरणची कंबरतोड प्रस्तावित दरवाढ; घरगुती वीज ग्राहकांना अतिरिक्त झटका बसणार ?

609 0

पुणे : महावितरणने २०२३-२४ साठी ३७% वीज दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ज्यामुळे आजच देशातील सर्वात जास्त दर असणा-या महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणा-या घरगुती ग्राहकांना ४०० ते ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त झटका बसणार आहे. तर ३०० युनिट पेक्षा जास्त वीज वापर वापरणा-या घरगुती ग्राहकांना ८०० ते १७०० रुपयांपर्यंत दरवाढ सोसावी लागणार आहे.

व्यापारी, छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे. तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास ३०% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. यातून नवीन उद्योग महाराष्ट्रात येणं तर सोडाच , आहेत तेही महाराष्ट्रातून पळ काढण्याची भिती आहे. व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागत असल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे.

नागरीकांना आमचे आवाहन आहे की या प्रस्तावित दरवाढीला ऑन लाईन पध्दतीने १५ फेब्रुवारी पर्यंत www.merc.gov.in/e-public-consultation या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत. त्याचा उपयोग करुन मोठ्या संख्येने या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : दुहेरी हत्याकांड प्रकरणात गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता 

Posted by - November 17, 2022 0
मुंबई : २००९ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुरुवारी येथील विशेष सीबीआय कोर्टाने गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची निर्दोष मुक्तता…
Arrest

पुणे रेल्वे स्थानकावर बॉंब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

Posted by - May 5, 2022 0
पुणे – नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही…

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…

डॉ. लता प्रकाश यांच्या माय लोटस माइंड या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन

Posted by - August 21, 2022 0
पुणे :डॉ. लता प्रकाश यांनी लिहिलेले माय लोटस माइंड हे पुस्तक आज पुण्यात खुप चर्चेत आहे. पुस्तकात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या…
Pune News

Pune News : रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असताना शिवाजीनगर व डेक्कन पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

Posted by - July 5, 2023 0
पुणे : पुणे शहरातील (Pune News) गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविण्याबाबत मा. पोलिस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *