महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

450 0

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Mumbaicha dabewala

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार नाही; मुंबईच्या डबेवाल्यांचा मोठा निर्णय

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) आधी ठाकरे गटासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मेळाव्याला न जाण्याचा निर्णय…

40 डोक्यांच्या रावणांनी प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठावलं – उध्दव ठाकरे

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक चिन्हाचा वाद समोर आला होता अखेर शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला हिसंक वळण; यवतमाळमध्ये बस पेटवली

Posted by - October 28, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा चौथा…

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत बदल; ‘या’ रस्त्यावरील वाहतूक राहणार बंद

Posted by - December 30, 2022 0
नववर्ष साजरे करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन लष्कर भागात शनिवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ…

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *