चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

467 0

पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी निलेश पवार वय वर्ष 49 या चित्रकला शिक्षकास अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सोळा वर्षीय युवतीच्या स्टुडिओमध्ये 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. चित्रकला शिकवण्यासाठी म्हणून आलेल्या या शिक्षकाने स्टुडिओमध्ये एकटे असताना विद्यार्थिनीवर डायलॉग बाजी करून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजकुमारचा डायलॉग त्याने मारला, “आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा,मेले हो जायेंगे! अशी डायलॉग बाजी करून तिच्या पायाला स्पर्श करून तुझे पाय किती मऊ आहेत असे म्हणून ती चित्र काढत असताना दरवाजा आतून बंद करून घेतला.

त्यानंतर या विद्यार्थिनीला कामसूत्राचे फोटो दाखवले आणि तिला मिठीत घेऊन तू मला खूप आवडते. तू केस मोकळे सोडत जा.केस मोकळे असताना सुंदर दिसते. आज कालच्या मुलींना लग्न झालेल्या एक्स्पिरियन्स माणसांशी संबंध ठेवायला खूप आवडतात. आय लव यू म्हणत तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी 16 वर्षीय तरुणीने विनयभंगाची तक्रार चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये केली होती. या शिक्षकाच्या पोलिसांनी आता मुसक्या आवळल्या आहेत.

Share This News

Related Post

Heatstroke

Pune News Update : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान! तापमानाचा पारा 42 वर; पुणेकर झाले हैराण

Posted by - April 29, 2024 0
Pune : पुण्यात उन्हाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. आज पुण्याच्या यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज कोणाचा…

विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट, उत्तर आणि मध्य भारत होरपळणार !

Posted by - April 29, 2022 0
मुंबई – एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस…

आगाखान पॅलेस येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ; स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य आणि त्याग प्रेरणादायी-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

Posted by - August 12, 2022 0
पुणे : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी…
Jalgaon News

Jalgaon News : धक्कादायक ! पत्नी मुलांसह बेपत्ता झाल्याने नैराश्यातून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 24, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नैराश्याच्या तणावातून आत्महत्या केली आहे.…
Bacchu Kadu

Bachchu Kadu : तलाठी भरती परीक्षेतील गोंधळावरून बच्चू कडूंनी व्यक्त केला संताप; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - August 21, 2023 0
अमरावती : तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्यानं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *