सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

243 0

नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होती. आजच्या युक्तीवादानंतर या प्रकरणावरील सुनावणी हे आता पुढच्या महिन्यात 14 फेब्रुवारीला होणार आहे.

सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यानंतर अनेक आमदार आणि खासदार यांनी शिंदेंचा हात धरून उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासूनच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे गट सत्ता संघर्ष सुनावणी सुरू आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात ही सुनावणी आज पार पडली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य खंडपीठांसमोर आजची सुनावणी पार पडली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल यांनी युक्तिवाद सुरू केला. युक्तिवादा दरम्यान सिब्बल यांनी मागच्या सुनावणी वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला आहे.

मागच्या सुनावणी दरम्यान आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरण्यावर अशी विनंती केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचं जाहीर केल आहे.

Share This News

Related Post

#Parenting Tips : मुलांकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेऊ नका, सवय कमी करण्यासाठी खास टिप्स

Posted by - March 10, 2023 0
#Parenting Tips : आजच्या आधुनिक काळात मोबाइल फोन ही केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठीही एक गंभीर समस्या बनत चालली…
CM EKNATH SHINDE

कार्तिकी एकादशी : महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात…

” निकालाकडे पाहताना फारसा उत्साह वाटत नाही, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे… ” अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणी…

महत्वाची बातमी : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

Posted by - December 16, 2022 0
पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पुण्याचे मावळते पोलीस…

#TOLL TAX : देशातील कोणत्याही मार्गावरून जात असताना ‘या’ वाहनांना द्यावा लागत नाही टोल टॅक्स

Posted by - March 14, 2023 0
एक्सप्रेस वे म्हटलं की टॅक्स हा भरावा लागणारच. एक्सप्रेस तयार झाल्यानंतर वाहन कुठले आहे, किती मोठे आहे यानुसार टॅक्स ठरवला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *