बातमी महत्वाची ! झेडपी, महापालिका निवडणूक दिवाळीत होणार ?

832 0

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेवर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, प्रशासकास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नियोजन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील २५ जिल्हा परिषद, १४ महापालिका व २८४ पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवरील प्रशासकास १५ ते २० मार्च रोजी वर्षपूर्ती होते आहे.

देशात एप्रिल ते मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. आता शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. त्यानंतर पावसाळा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीतच होईल, अशी माहिती नगरविकास व ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर दिवाळीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेणे शक्य होणार आहे.

Share This News

Related Post

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर…

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

Posted by - August 11, 2022 0
पुणे:स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्रातील ओबीसी…

दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार ! झूम कॉलच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षांवर वॉच !

Posted by - January 16, 2023 0
दहावी बारावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केल आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून राज्यातील 9 हजार केंद्रांवर मोबाइल कॅमेऱ्यांचा वॉच असणार…

उमेदवारांसाठी महत्वाची माहिती : MPSCआणि B.Ed CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - August 17, 2022 0
मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना…
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *