‘इंजिनिअरिंगचा चमत्कार’ आणि हाहाकार! मोरबी नदीवरील पूल कोसळून 141 जणांचा मृत्यू; हृदयाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO समोर

440 0

गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. 200 पेक्षा जास्त जण या घटनेत जखमी झाले असून 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जातेय. या पुलावर लोक फेरफटका मारण्यासाठी आले असताना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला आणि सर्वत्र एकच हाहाकार उडाला.

रविवारी सायंकाळी गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या घटनेत पुलावरील
सुमारे 500 हून अधिक जण नदीपात्रात पडले. या दुर्घटनेत 141 जणांना आपला जीव गमवावा लागला. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून याकामी लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जातेय. आतापर्यंत 177 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये.

रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. घटनास्थळी 30 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 140 वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ब्रिटिशांच्या काळातील हा ब्रीज आहे. पाचच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या या पुलाची केबल तुटल्यानं ही दुर्घटना घडली. छटपूजेच्या निमित्तानं या पूलावर 500 ते 600 भाविक जमले असल्याचं सांगण्यात येत असून पूल अचानक कोसळल्यानं अनेक महिला व लहान मुलंदेखील नदीत कोसळली.

घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जातेय. केबल किंवा सस्पेन्शन असलेल्या या पुलाची लांबी 765 फूट असून या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मच्छू नदीवर दरबारगढ महल आणि लखधीरजी कॉलेजला जोडणारा हा पूल 1.25 मीटर रूंद आणि 233 मीटर लांब होता. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी या पुलाचं उद्घाटन केलं होतं. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारं सामान इंग्लंडहून आणण्यात आलं होतं. नुकतंच नूतनीकरण केलेला हा केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळं त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

25 ऑक्टोबर रोजी हा पूल जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. या पुलाची मध्यभागी दोन शकलं झाली आणि तो नदीत कोसळला. या पुलाच्या नूतनीकरण कामाच्या सखोल चौकशीच्या मागणीनं आता जोर धरलाय. ओरेवा ग्रुपकडं या पुलाच्या देखभालीची जबाबदारी होती. त्यासंदर्भात ही कंपनी आणि मोरबी नगरपालिकेत एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीनं मार्च 2022 ते मार्च 2037 या 15 वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असं या कराराद्वारे ठरवण्यात आलं होतं. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणं अशी अनेक कामं ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती. दरम्यान, पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीये तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केलीये. ‘इंजिनिअरिंगचा चमत्कार’ म्हटला गेलेला हा पूल असा अचानक कोसळल्यानं शेकडो लोकांचा बळी गेला त्याचं काय ?

Share This News

Related Post

Cricket

Viral Video: अंपायरने भर मैदानात ‘चंद्रा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : क्रिकेटच्या (Cricket) मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन (Umpire Billy Bowden) आपल्याला माहीतच असेल. ते…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मतदार नावनोंदणीसाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ

Posted by - July 14, 2022 0
पुणे: सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०२२ या वर्षात होणाऱ्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी…

तर… देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील- देवेंद्र फडणवीस

Posted by - June 12, 2022 0
पंकजा मुंडेंना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा…

“कैदी हे माणूस आहे त्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका !”, कैद्यांचे नातेवाईक आक्रमक; पुण्यातील येरवडा कारागृहाबाहेरील आंदोलन 

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह बाहेर आज येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केल आहे. कारागृहातील कैद्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका,…

पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली  : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *