लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे, त्यासाठी कालमर्यादा निश्चित व्हावी : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

668 0

मुंबई : विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले.

लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही समिती 19 सदस्यांची असेल. या समितीची नावे आजच निश्चित करण्यात येतील असे जाहीर केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “इतर राज्यातील झालेले निर्णय तपासून मग यावर निर्णय घ्या. कालमर्यादा ठरवा. लोकपाल काय निकषांवर तयार झाले आहे हे तपासण्याची गरज आहे.”

“राज्यात खोट्या तक्रारीवर काय शिक्षा आहे याची जाणीव लोकांना आहे. माहिती अधिकार कायद्याच्या भीती दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. जमिनीचे गैरव्यवहार होत आहेत. रातोरात झाडे लावून मूल्यांकन वाढवण्याचे प्रकार होत आहेत,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. दिलीप वळसे पाटील, आ. सचिन अहिर, आ.अभिजीत वंजारी, आ. विलास पोतनीस, आ. प्रवीण दरेकर, आ. एकनाथ खडसे, आ. जयंत पाटील,आ. कपिल पाटील, प्रधान सचिव नगर विकास आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारमधून संसदेत पोहोचले ! काय आहे ही कार ?

Posted by - March 30, 2022 0
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आज ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सुसज्ज कारमधून संसदेत आगमन…

एवढे मंत्री, आमदार एकाचवेळी राज्याबाहेर गेल्याचे कळले कसे नाही ? शरद पवार संतापले

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकांवर बैठका…
Pune News

Pune News : धक्कादायक! रात्री लावलेल्या दिव्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 15, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) जुन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) रात्रीच्या वेळी घराला लागलेल्या आगीत…

नव्या प्रभाग रचनेमध्ये तोडफोड झाल्यास अनेक विद्यमान नगरसेवकांना बसणार फटका

Posted by - February 1, 2022 0
पुणे- आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील…

बापरे…! अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ ; रावण दहन झाल्यानंतर पेटता पुतळा पडला नागरिकांच्या अंगावर

Posted by - October 6, 2022 0
हरियाणा : दसरा भारतभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी रावणाचे मोठमोठे पुतळे दहन करण्याची प्रथा आहे. रावण दहनाचा हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *