पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात कायदेशीर लढाई ; ॲड. असीम सरोदेंमार्फत उच्च न्यायालयात याचिका

488 0

पुणे : विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही व त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता व संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे असा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

गणपती उत्सव पुढील काही दिवसात सुरु होणार आहे आणि अशातच पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा व पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते, अनेकदा व दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत तर पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते, मानाचे गणपती मिरवणुक पूर्ण करायला खूप वेळ लावतात, मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे दाखल करतात अशा व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई म्हणाले व त्यांना अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त पुणे यांच्यासह पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती. केसरीवाडा गणपती यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. तृणाल टोणपे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी दिली. मानाच्या या पाच गणपती मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्राधान्य दिले जाते “कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार या पाच मंडळांना हा प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे अशी विचारणा संजय बालगुडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयाला विचारली तेव्हा याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नसल्याचे कळविण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे.

बुद्धीची देवता असलेले गणपती नक्कीच पोलीस व प्रशासनाला सुबुद्धी देतील तसेच मानाच्या गणपतींचे पदाधिकारी हा विषय समजून घेतील तर एका दिवसात सुद्धा तोडगा निघेल व आम्हाला उच्च न्यायालयातील याचिका चालविण्याची गरज पडणार नाही असा आशावादी दृष्टीकोन शैलेश बढाई यांनी व्यक्त केला.

मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल त्यांना पोलीस आयुक्तांनी परवानगी द्यावी व तशी सोय उपलब्ध करून द्यावी, मानाच्या गणपती मंडळांनी किती वेळात विसर्जन मिरवणूक पूर्ण करावी याबाबत स्पष्ट वेळ मर्यादा घालून द्यावी, जे मंडळ पहिले येतील त्यांनी पहिले लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढावी अशी संमती मानाच्या पाच गणपती मंडळांनी द्यावी, भेभाव आणि विषमता निर्माण करणाऱ्या व जोपासणाऱ्या रूढी-परंपरा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने पारित करावेत व कोणत्याच विसर्जन मिरवणुकांच्या मध्ये यानंतर सुद्धा कधीच विषमता असू नयेत, सर्व मंडळांनी ध्वनिप्रदूषण नियम व आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश न्यायालयाने देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : शाळेतून गायब झालेल्या ‘त्या’ चिमुकलीचा मृतदेह सापडला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 6, 2023 0
सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील पहिलीच्या…
Accident

Accident : जुन्या मुंबई महामार्गावर पीकअप कंटेनरमध्ये भीषण अपघात; 1 ठार तर 2 जखमी

Posted by - June 24, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी केमिकल ट्रकचा अपघात (Accident) होऊन चार जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक मोठा…

देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

Posted by - April 1, 2022 0
पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली…

“जग्गू आणि जुलिएट” चा कलरफुल ट्रेलर रिलीज : अमेयचा जग्गू आणि वैदेहीची जुलिएट करणार उत्तराखंडात धमाल

Posted by - January 25, 2023 0
पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची चर्चा त्याचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच झाली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने…

रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका – चित्रा वाघ

Posted by - March 15, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासन व पोलिस या प्रकरणात कोणतीही गांभीर्याने दखल घेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *