जिवलग मैत्रिणीने घेतला गळफास,दुसरीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी; पुण्यातील खळबळजनक घटना

768 0

हडपसर : हडपसर येथील शेवाळवाडीमध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. एकीने गळफास घेतला तर तिला अॅम्बुलन्समधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सारिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९ रा. क्रिस्टल सोसायटीकडूनच, शेवाळेवाडी) व आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९रा. मराठी शाळेसमोर शेवाळेवाडी) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून वरील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात  वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा व सारिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळतच पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पहिला व तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. व ती रुग्णवाहिकेजवळ पडली उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिचाही मृत्यू झाला.अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली हाेती.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Share This News

Related Post

Leopard Hunting : बिबट्याची शिकार करुन फार्महाऊसमध्ये लपवले अवयव; 2 बड्या उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - August 21, 2023 0
पुणे : बिबट्या या वन्य प्राण्याची शिकार (Leopard Hunting) करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये (Leopard…

माजी खासदारांची पेन्शन बंद करा; महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Posted by - March 17, 2023 0
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार सोडून आर्थिक दृष्ट्यासक्षम असलेल्या ४ हजार ४९६ माजी खासदारांची…

Nagpur Press Conference : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का? शरद पवारांचे सूचक वक्तव्य (Video)

Posted by - July 15, 2022 0
नागपूर : शिवसेनेतील बंडा नंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेसोबत महाआघाडीच्या रूपात सत्तेत सहभागी झालेल्या…
Pune Crime

Pune Crime : पुण्यातील बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाचा साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - September 23, 2023 0
पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न…

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का ? सगळे साहित्य आणून झाले आहे ? तरीही एकदा पूजा सामानाची ही लिस्ट चेक करा …

Posted by - August 26, 2022 0
गणपती बाप्पांचं येत्या बुधवारी 31 ऑगस्टला आगमन होते आहे. श्री गणेशाचे आगमन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा तो भावनिक कप्पा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *