कल्याणमधील ‘मी शिवसेना बोलतेय’ या देखाव्यास अखेर हिरवा कंदील ! काही अटी-शर्तींसह कोर्टाची परवानगी…

171 0

कल्याण : कल्याणमधील एका गणेश मंडळांनं साकारलेल्या ‘मी शिवसेना बोलतेय’ या वादग्रस्त देखाव्याला न्यायालयानं काही अटी-शर्तींसह सादर करण्यास परवानगी दिली. या वादग्रस्त देखावा सादर करण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती.

See the source image

कल्याणमधील विजय तरूण मित्र मंडळानं ‘मी शिवसेना बोलतेय’ असा एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. गणेशोत्सवाचं औचित्या साधून साकारण्यात आलेल्या या देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळानं या कारवाईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं काही अटी-शर्तींसह देखावा सादर करण्यास परवानगी दिली. कल्याण येथील ठाकरे गटातील पदाधिकारी विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळानं गेल्या तीन महिन्यांत शिवसेनेत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर आधारित “पक्ष निष्ठा” या विषयावर चलचित्र देखावा साकारला आहे.

‘मी शिवसेना बोलतेय’ इथून या चलचित्र देखाव्याला सुरुवात होते. शिवसेनेला एक मोठा वृक्ष दाखवण्यात आलं असून या वृक्षाला फळं लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा प्रकारचा हा देखावा आहे. या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली होती.

Share This News

Related Post

Mumbai Map

महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; नवीन यादी आली समोर

Posted by - May 17, 2023 0
मुंबई : राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा (New District) तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार (Population) जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला…

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणू, व्ही मुरलीधरन यांचे पालकांना आश्वासन

Posted by - March 2, 2022 0
पुणे- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी हे अडकले असून या…

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येणार- अजित पवार

Posted by - April 9, 2022 0
तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेवून मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे…

PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात वाढ होणार – प्रमोद (नाना) भानगिरे

Posted by - December 26, 2022 0
पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात…

वाहनचालकांनो, आपल्या वाहनात इंधन भरून घ्या, पेट्रोल पंप चालकांचे आज एकदिवसाचे आंदोलन

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवण्यासाठी आज देशभरातील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप चालकांनी 31 मे रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *