पाऊसाचा हाहाकार; अग्निशमन दलाकडून 12 जणांची सुखरुप सुटका

228 0

पुणे – काल राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ- देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
पुणे – ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे…

‘आज तुला जिवंत सोडत नाही’…. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जीवघेणा हल्ला

Posted by - April 11, 2023 0
शाळेचे स्नेहसंमेलन पाहून कारमधून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीला बेदम मारहाण…
Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Posted by - March 26, 2024 0
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण…

#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

Posted by - February 14, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये 6 फेब्रुवारीला एक धक्कादायक घटना घडली होती. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन चिमुकले बेशुद्ध झाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *