पुणे : अग्निशमन दलाचे नियंञण कक्ष विमा कंपनीच्या रेकॉर्डिंगने व्यस्त…

169 0

पुणे : अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष हे आग वा आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे कार्य पार पाडत असते. दलाच्या नियंत्रण कक्षात दिवसभरात शेकडो विविध प्रकारचे दुरध्वनी येत असतात व त्याप्रमाणे नियंत्रण कक्षातील जवान परिस्थिती हाताळत योग्य ती सेवा बजावत असतात.

परंतु सध्या पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक १०१ वर गेले दोन दिवस (दिनांक ०४|१०|२०२२ पासून) विमा कंपनीचे ध्वनीमुद्रित रेकॉर्डिंग सातत्याने वाजत आहे. नियंत्रण कक्षामधे असणारे चार इनकमिंग लाइन्स यावर विनाविलंब विमा कंपनीचे रेकॉर्डिंग फोन उचलताच ऐकू येते. यामुळे दलाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असून नागरिकांनी संपर्क साधल्यास नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी व्यस्त असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आग वा आपत्कालिन प्रसंगी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यामधे विमा कंपनीचे नाव समजत नसून “८०३७६८१००३\८०७१६३१०९९” या क्रमांकावरून सातत्याने संपर्क होऊन विनाकारण ञास होत आहे.

संबंधित विषयावर बीएसएनएलच्या कार्यालयशी संपर्क साधून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून त्यांचे अधिकारी व कर्मचारी याबाबत पुढील कार्यवाही करत आहेत.

आग वा आपत्कालिन अतिप्रसंगी अग्निशमन दलाचे नियंञण कक्ष दुरध्वनी क्रमांक १०१ वर संपर्क न झाल्यास इतर विकल्प क्रमांक खालीलप्रमाणे …

नियंत्रण कक्ष 020-26451707

नियंञण कक्ष अग्निशमन अधिकारी👇

पंकज जगताप 9823101453

प्रदीप खेडेकर 9890015101

वरिष्ठ अग्निशमन अधिकारी 👇

रमेश गांगड 9689930070

गजानन पाथ्रुडकर 9689930090

Share This News

Related Post

थरारक पाठलाग करत तरुणाला भर रस्त्यात संपवले, नाशिकमधील घटना

Posted by - July 23, 2023 0
नाशिक- दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा पाठलाग करत तिघांनी चॉपरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील…

वृक्ष गणेशा प्रसाद’ उपक्रमाद्वारे ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचे निसर्गसंवर्धनाकडे पुढचे पाऊल (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे – जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केल्यानंतर आता वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाद्वारे श्रीमंत दगडूशेठ…

मोठी बातमी : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Posted by - December 22, 2022 0
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातीलखासगी…

धक्कादायक ! आई वडिलांनी पोटच्या मुलाला डांबून ठेवले, ते सुद्धा २२ कुत्र्यांच्या सोबत

Posted by - May 11, 2022 0
पुणे- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईवडिलांना आपले मूल म्हणजे जीव की प्राण असते. पण या जगात असेही…

बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार! देशभरातील रिक्षा संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद

Posted by - December 3, 2022 0
पुणे : आज देशभरातील रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *