शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं; “हात जोडून सांगतो साहेब कळकळीची विनंती … !”

407 0

जालना : देशभरात लम्पी आजारानं थैमान घातलेलं असताना लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र सध्या चर्चेत आहे. शेतकऱ्यानं नेमकी काय व्यथा मांडली आहे पाहूया.

जालना जिल्ह्यातील कृष्णा एकनाथ खरात या शेतकऱ्याने लम्पी आजाराविषयी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. कृष्णा एकनाथ खरात असं या शेतकऱ्याचं नाव असून जालना जिल्ह्यातील रोषणगाव येथील रहिवासी आहे. रोषणगाव परिसरात लम्पी आजारामुळे १६ जनावरं दगावली आहेत. तसच दोनशेपेक्षा जास्त जनावरांना लम्पी आजारानं ग्रासलं आहे.

मात्र, एक महिन्यापासून ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी गैरहजर असल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळं ग्रामसेवक संघटनांनी शिक्क्यावर बहिष्कार टाकला आणि शेतकरी अडचणीत सापडला. याच कारणास्तव ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं.

जनावरांना होणाऱ्या लम्पी आजारामुळे राज्यभरातील शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे स्थानिक प्रशासन, राज्य सरकारन कधी लक्ष देणार हाच प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांतून उपस्थित केला जातोय.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरेंचा राजीनामा; संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार

Posted by - June 30, 2022 0
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले असून…

कियारा सिद्धार्थचे ठरलयं ! ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

Posted by - December 31, 2022 0
मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हि जोडी बॉलिवूडची फेव्हरेट जोड्यांपैकी एक आहे. नुकताच कियाराचं गोविंदा मेरा नाम तर…
Latur News

Latur News : सांगवी-सुनेगाव येथे बस – ट्रकचा भीषण अपघात; 29 जण जखमी

Posted by - August 17, 2023 0
लातूर : लातूर-नांदेड (Latur News) राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या…
Ajit Pawar And Sharad Pawar

NCP News : बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा आला समोर अजित पवारांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार…

#ELECTIONS : कसब्यात मतदात्यांचा अल्प प्रतिसाद ; कसबा आणि चिंचवडच्या मतदानाची आतापर्यंतची किती आहे टक्केवारी, वाचा सविस्तर

Posted by - February 26, 2023 0
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. दोन्ही प्रमुख पक्षांसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *