कसब्याची चर्चा काही थांबेना ! रुपाली पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर तृप्ती देसाईंनी उघडलं तोंड… पाहा VIDEO

457 0

पुणे : दादागिरीची आणि शिवराळ भाषा करणाऱ्यांना राष्ट्रवादी तिकीट देईल, असं मला तरी वाटत नसल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रुपाली पाटलांना टोला हाणला. भाजप आ. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यास आपण लढण्यास इच्छुक असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी नुकतीच मांडली होती. 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर काही दिवसातच रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीवरून पुण्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या. अशातच ‘राष्ट्रवादी काँग्रेसनं मला आदेश दिल्यास मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी बोलून दाखवली होती.

रुपाली पाटील यांच्या याच भूमिकेवर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकत नाही. मनसेनं त्यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती तेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्हयुज होत्या परंतु पाच जिल्ह्यांतून मतांचा दहा हजारांचा टप्पासुद्धा त्यांना पार करता आला नव्हता. शिवाय वारंवार दादागिरी करणारा आणि तोंडात सततची शिवराळ भाषा असणारा कार्यकर्ता किंवा कार्यकर्तीला राष्ट्रवादी कसबा मतदारसंघातून उमेदवार म्हणून देईल, असं वाटत नाही, असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय.

पुणे महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी देखील या चर्चेत उतरून भाजपनं मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊन इतर पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असं म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही घाईची चर्चा थांबावी, पुण्याच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही, असं म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला जावा, असं म्हटलं होतं मात्र तृप्ती देसाईंनी रुपाली पाटलांविषयी तोंड उघडल्यानं ही चर्चा अजून तरी पूर्णविरामापर्यंत पोचू शकलेली नाही, हेच खरं !

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी…

मोठी बातमी : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे भारत जोडो पदयात्रे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Posted by - January 14, 2023 0
पंजाब : एक मोठी बातमी समोर येते आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

Posted by - January 25, 2023 0
एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील…

विधान परिषद निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप ! एकनाथ शिंदे यांचे बंड ?

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. एकनाथ शिंदे…

अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर दोन महिलांनी फेकली शाई

Posted by - February 9, 2022 0
अमरावती- अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *