‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न ; जगभरातून हजारो गणेशभक्तांनी घरबसल्या घेतला सांगता मिरवणुकीचा आनंद

283 0

पुणे : मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ बेलबाग चौकात दाखल झाला.

त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली होती. पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात आली. याशिवाय देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील झाले.

त्यापाठोपाठ स्व-रूपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामध्ये ध्वज, टाळ यांसह मर्दानी खेळ व ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यामागे केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता.

बेलबाग चौकामध्ये सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला.

श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला. रथावर ८ खांब साकारण्यात आले होते. संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले.

पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले. टिळक चौकामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया… जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले.

हजारो भाविकांनी घरबसल्या घेतला दगडूशेठ गणपती गणेशोत्सव सांगता मिरवणुकीचा आनंद

गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातून घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी भाविकांना ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. देश -परदेशातील भाविकांना देखील या सांगता मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा असते, मात्र, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे यंदा संपुर्ण सांगता मिरवणूक ट्रस्टची वेबसाईट http://www.dagdushethganpati.com यावरून भाविकांना घरबसल्या लाईव्ह पाहता आली.

Share This News

Related Post

“म्हतारे-थरथरते हात, त्यांच्या हातात काय करणार तलवार देवून” अशी बाळासाहेबांवर टीका आपणच केली होतीत…? शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांची सुषमा अंधारेंवर जहरी टीका, वाचा सविस्तर

Posted by - November 2, 2022 0
शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांनी सुषमा अंधारे यांना पात्र लिहून त्यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. हे पत्रं व्हायरल झालं आहे.…

ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर…
Vishal Agrawal

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या…

लाऊडस्पीकरवरून अजान हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात…

‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ पटोलेंचे वादग्रस्त विधान

Posted by - January 24, 2022 0
नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *