महाराष्ट्र : दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून ही प्रकिया सुरू होणार होती. प्रशासकीय कारणास्तव ती स्थगित करण्यात आली आहे. ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी सांगितले. मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नसून, अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय.
कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720 पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204 अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68 रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24 पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348 गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51 यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154 नांदेड – 155
एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956