#CRIME NEWS : झोपेतून उठवले म्हणून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच संपवले; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

716 0

पिंपरी चिंचवड : कामावर जाण्यासाठी आईने मुलाला झोपेतून जागं करण्यासाठी आवाज दिले. पण गाढ झोपेत असलेल्या त्या मुलाला झोपेतून उठवण्याचा एवढा राग आला की त्याने थेट आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादाय घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये दुर्दैवी जन्मदात्रीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने या आरोपी नराधम मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अशोक शिंदे वय वर्ष 30 असे आरोपीचे नाव आहे. हा एक सराईत गुन्हेगार असून एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. तर चार वर्षे तो तुरुंगात देखील होता. या हल्ल्यामध्ये पारेगाबाई यांचा मृत्यू झाला आहे. पारेगाव यांना तीन मुली आणि एक मुलगा म्हणजेच विश्वास हा होता.

या तीनही मुलींची लग्न झाली होती. तर विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर लेबर म्हणून काम करत होता. आणि पारेगाबाई या देखील कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर विश्वास याला दारूचे व्यसन लागलं होतं. दरम्यान दारू पिऊन विश्वास आदल्या रात्री झोपला होता. कामावर जाण्यासाठी सकाळी पारेगाबाई या त्याला उठवण्यासाठी गेल्या तेव्हा मुलाला संताप आला आणि त्याने थेट आईवर जीवघेणा हल्ला केला.

यामध्ये डोक्यावर घाव घातल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. जीव वाचवण्यासाठी त्या घराच्या बाहेर पळाल्या, विश्वासही पुन्हा त्यांच्या मागे पळाला होता. पण शेजारी धावत आल्याने तो प्रसंग तिथे थांबला. पण पारेगाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Share This News

Related Post

राजकीय सूडबुद्धीने आपल्यावर गुन्हा दाखल, रघुनाथ कुचिक यांचे स्पष्टीकरण

Posted by - February 17, 2022 0
पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेमुक्त करण्याचा निर्धार

Posted by - October 6, 2023 0
पुणे: पुण्यासह राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंती उत्साहात मात्र डीजे आणि लेझर या गोष्टी टाळून करावी असे…

आजची सर्वात मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

Posted by - February 7, 2023 0
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कडू राजकारणाला झालेली सुरुवात मोठ्या विघ्नाकडे वाटचाल करते आहे. काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील…

NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

Posted by - September 2, 2022 0
पुणे : चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे…

Decision of Cabinet meeting : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अतिरिक्त जागांकरिता येणाऱ्या खर्चात राज्याचा हिस्सा

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 50 या प्रमाणे एकूण 750 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मंजूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *