Thane

ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; थोडक्यात बचावला ड्रायव्हर (Video)

637 0

ठाणे : सध्या मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मेट्रोचे काम सुरु असताना अचानक एक सळई ब्रीजवरून खाली पडली आणि थेट कारमध्ये जाऊन घुसली. ही धक्कादायक घटना ठाण्यामध्ये घडली आहे.

ही सळई थेट ब्रीजखालून जाणाऱ्या कारवर पडली. ही सळई उभी पडल्याने कारच्या आरपार घुसली आहे. यामध्ये नशीब चांगले म्हणून कार चालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ब्रीजवरुन सळई पडली आणि थेट गाडीचे छत छेदून ड्रायव्हर सीटमध्ये घुसली आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक पाहात राहिले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. तीन हात नाका या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इको गाडीचं छत छेदून लोखंडी सळई घुसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

शिक्षकांच्या संपामुळे 1500 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नुकसान

Posted by - March 9, 2022 0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे.याचा प्रशासकीय कामांसोबतच…

प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच प्रशासक घेणार पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा

Posted by - April 10, 2022 0
पुणे महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच सोमवारी महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्यसभा होणार आहे. स्थायी समिती, शहर सुधारणा समितीमधून आलेल्या प्रस्तावांवर…
Satara News

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

Posted by - January 20, 2024 0
सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये साताऱ्यात राजवा़डा परिसरात अर्धनग्नावस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange : आरक्षणासाठी दिलेली मुदत संपली; जरांगे पाटलांची पुन्हा उपोषणाला सुरुवात

Posted by - October 25, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *