महत्वाची बातमी !मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. दोघांचा मृत्यू

289 0

सिंधुदुर्ग- मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. बोट कशामुळे बुडाली याची माहिती अद्याप मिळाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जय गजानन नावाची बोट स्कुबा डायव्हिंग करून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर २० जणांना घेऊन जय गजानन नावाची बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथू परत येताना समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक बोट उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु झाले.

या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. मात्र, बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 

 

Share This News

Related Post

Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Posted by - January 22, 2024 0
अयोध्या : अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता अखेर तो मंगलमय क्षण आज आला आहे. आज दुपारी अयोध्येतील…
Ambadas Danve

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 27, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात (Ambadas Danve) आली आहे. यामध्ये 17 जणांच्या नावाचा…

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीत सात ते आठ कंपन्या खाक

Posted by - April 11, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील सोनवणे वस्ती इथं एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत जवळपास सहा ते सात कंपन्या पूर्णपणे खाक झाल्या…

Top News Informative : राजकीय नेत्यांना घाम फोडणारी ‘ईडी’ नक्की आहे काय ?

Posted by - March 14, 2023 0
महाराष्ट्रात आणि देशभरातच सध्या ईडीच्या कारवायांनी जोर पकडला आहे. भाजप केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव आणत असल्याचे आरोपही…

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 12, 2023 0
मुंबई : ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारे महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *