डेंगी, चिकनगुनिया सारखे आजार थोपवण्यासाठी उपाययोजना करा ; सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन

266 0

पुणे : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त श्री संदीप खलाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, स्वप्नील कांबळे, अनिल माने आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अद्यापही पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी सर्वत्र साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत.

नागरिकांचे स्वास्थ बिघडल्याने महानगरपालिका,शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. नागरिक मोठ्या संख्येने डेंगीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या साथरुग्णांवरील औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.

तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत आपण औषध फवारणी, वस्ती पातळीवर धूर फवारणी यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच वस्तीमधील ड्रेनेज लाईनची स्वच्छता, जनजागृती करणे, याप्रमाणेच डास उत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, डासांची उत्पत्तीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाय योजना तातडीने कराव्यात. अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.

Share This News

Related Post

pune crime

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - April 15, 2024 0
Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून पुण्यातील एका जत्रेत आकाश पाळण्यात बसताना 9 वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी सरसावले मुरलीधर मोहोळ; पक्षातील ‘या’ नाराज नेत्यांच्या घेतल्या भेटी

Posted by - March 18, 2024 0
पुणे : पुणे शहरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचाराला सुरुवात केली…

आताची महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी, गटनेतेपदी या नेत्याची निवड

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. आताच आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून…
Murder

दौंड हादरलं! तृतीयपंथीयाची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या

Posted by - June 10, 2023 0
दौंड : वरवंड या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका तृतीयपंथीयाचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी…

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला पूर्वनियोजित;जितेंद्र आव्हाडांचा दावा

Posted by - April 10, 2022 0
शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *