#AURANGABAD : सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप

611 0

याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश

औरंगाबाद : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुभेदारी शासकीय विश्रामगृह व्यवस्थापक रशीद शेख आणि इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप यांनी केली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, विवेक जगताप यांनी सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करण्यासाठी व्यवस्थापक रशीद शेख यांच्याकडे लेखी आरक्षण मागणी केली असता व्यवस्थापक रशीद शेख ने अतिरिक्त पैशाची मागणी केली व जाब विचारला असता उलट अरेरावीची भाषा व वापरुन अपमानास्पद वागणूक दिली.

तसेच जगताप यांना या शासकीय विश्रामगृहाच्या रुममध्ये दारुच्या पार्ट्या करतानाचे आढळले तसेच विश्रामगृहातील कर्मचारी कुठलेही काम करत नसून स्वतःच्या खाजगी कामात जास्त दंग असतात. तरी या शासकीय विश्रामगृह प्रशासनाच्या अनागोंदी कारभार याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विवेक जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपसचिव यांच्याकडे केली आहे.

तरी विवेक जगताप यांना सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मान. उपसचिव यांनी दिले आहे, तसेच मुख्य अभियंता सार्व. बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून व कायदेशीर कारवाई करुन शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश मान. उपसचिवांनी दिले आहेत. याप्रकरणी कक्ष अधिकारी सु. प्र. मोहिते यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Share This News

Related Post

चुकूनही ठेऊ नका ‘हे’ सामान्य पासवर्ड; अन्यथा तुमचा मोबाईल होऊ शकतो काही सेंकदात हॅक

Posted by - November 19, 2022 0
पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते.आपला फोन आपला ई-मेल आणि सोशल मीडियासह इंटरनेट बँकिंग यांच्या…

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, ‘या’ कारणामुळे सभा रद्द केली

Posted by - May 18, 2022 0
पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेनेचे पावसाचे कारण…

बसमध्ये झाली मैत्री; पुस्तक खरेदीच्या बाहण्याने पोहोचले पुण्यात; आरोपीने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला, तरुणीची 16 लाखाची फसवणूक

Posted by - March 1, 2023 0
पुणे : पुण्यात रोजच अत्याचार, बलात्कार फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात…
Aadhar Update

फ्रीमध्ये ऑनलाइन आधार अपडेटसाठी आज शेवटची संधी! उद्यापासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Posted by - June 14, 2023 0
नवी दिल्ली : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले…

40 डोक्यांच्या रावणांनी प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठावलं – उध्दव ठाकरे

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक चिन्हाचा वाद समोर आला होता अखेर शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *