Supriya Sule

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईचा प्रश्न सोडवा, सुप्रिया सुळे यांची मागणी (व्हिडिओ)

346 0

पुणे- केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झाले आहे. तर मग पैसे तुमच्यापाशी कशाला ठेवलेत ? महागाई कमी करण्यासाठी सबसीडी द्या . प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारने महागाईचा प्रश्न सोडवायला हवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिपार चौकातील मारुती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी सुळे बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासहित पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपाचा झेंडा उलटा लावत कमळाबाई, महागाईची देवी अशा आरत्या करण्यात आल्या. भष्टाचाराचा निषेधही करण्यात आला .

सुप्रिया सुळे म्हणाल्या,” सातत्याने संसदेत सांगत होते , की महागाई वाढत आहे . पण आपण त्यावर चर्चा करायला हवी होती . ती केली नाही आणि आज महागाई प्रचंड वाढली आहे. आरबीआयने व्याजदर वाढवले. त्याच्याबद्दलही आम्ही एक ते दीड महिन्यांपासून सांगत होतो. आम्हाला हे दिसत होते. केंद्र सरकारला आणि अर्थमंत्रालयाला हे दिसत कसे नाही, असा सवाल त्यांनी केला.

हे आंदोलन एवढ्यावरच थांबणार नसून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, विभागात, तालुक्यात जाणार आणि महागाईच्या मुद्द्यावर आवाज उठवणार, सर्वसामान्य माणूस महागाईमुळे बेजार झाला असून त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Share This News

Related Post

Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

Posted by - June 20, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…
Pune News

Pune News : पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतला आढावा

Posted by - March 4, 2024 0
पुणे : पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गातील काही महत्त्वाचे टप्पे पुणे (Pune News) जिल्ह्यातून जातात. तेथे अंतिम टप्प्यात असलेली कामे 30…

‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन

Posted by - September 14, 2022 0
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर…
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये आढळला बेवारस मृतदेह

Posted by - September 13, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील दिघी परीसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीचा पठारे मळा…

दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

Posted by - September 29, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *