Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

156 0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2018 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील सेक्शन 377 काढून टाकलं. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय LGBT समुदायासाठी ऐतिहासिक होता. त्यापूर्वी समलैंगिक संबंध असणं हा गुन्हा होता. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यापुढे समलैंगिक संबंध असणं हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार नाही. हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक होता”

या निर्णयामुळे समलिंगी व्यक्तींना कायदेशीर मान्यता मिळाली. मात्र आता समलिंगी विवाहांनाही कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यापूर्वी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर उत्तर देताना ‘आपल्या देशातील संसदेने तयार केलेले कायदे पुरुष आणि स्त्रीमध्ये झालेल्या विवाहालाच मान्यता देतात. वेगवेगळे धार्मिक समुदायांचे रितीरिवाज, संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक कायद्यांचा त्यात अंतर्भाव आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपामुळे देशातल्या या कायद्यांचं संतुलन बिघडेल आणि अनागोंदी निर्माण होईल,’ असं केंद्र सरकारनं उच्च न्यायालायत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं

Share This News

Related Post

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप…

तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना

Posted by - February 26, 2022 0
नलगोंडा- तेलंगणात प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. ही घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा…

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप दाखल करणार उमेदवारी अर्ज ! दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत भाजपची पदयात्रा

Posted by - February 6, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत. भाजपच्या वतीने आज कसबा…

विटंबना झालेल्या महाराजांच्या बंगळुरूमधील पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दुग्धाअभिषेक

Posted by - February 19, 2022 0
बंगळुरू- काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते.…
EVM

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Posted by - May 7, 2024 0
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी (Solapur Loksabha) आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *