सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : बलात्कार पीडितेवर केल्या जाणाऱ्या ‘Two Finger Test’ वर बंदी

382 0

नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आज तेलंगणा हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध दाखल अर्जावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तेलंगणा हायकोर्टाने बलात्कार प्रकरणी ट्रायल कोर्टाने नोंदवलेली शिक्षा रद्द केली होती.

बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पिडीतेची कौमार्य चाचणी अर्थात टू फिंगर टेस्ट केली जाते. या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच यापुढे अशी चाचणी कोणी केली तर गैरवर्तनाच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देखील केला आहे. लैंगिकदृष्ट्या सक्रिय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात असून, सत्यापेक्षा मोठे काहीही नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

त्याचबरोबर पीडित महिलेवर टू फिंगर टेस्ट म्हणजे पुन्हा एकदा अत्याचार करण्यासारखेच आहे. म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारांनी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाईन्स सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये पाठवाव्यात असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#BREAKING : भर दुपारी सिंहगड रस्त्यावर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराचा थरार; वॉट्सअप पोस्टवरून झाले वाद, बांधकाम व्यावसायिकाने केला गोळीबार

Posted by - January 24, 2023 0
पुणे : पुणे शहरामध्ये सध्या गुन्हेगारीच्या धक्कादायक वृत्तांनी शहरांमध्ये दहशत पसरली आहे. एकीकडे कोयता यांची दहशत असताना सिंहगड रस्त्यावरील सनसिटी…

BSNL ला मागे टाकत Reliance Jio बनली देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता कंपनी

Posted by - October 19, 2022 0
खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला मागे टाकून देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन…

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा – किरीट सोमय्या (व्हिडीओ)

Posted by - April 1, 2022 0
पुणे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असून मुश्रीफांची बेनामी मालमत्ता जप्त करावी अशी…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’;राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली हमी

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्हांच्या नामांतराचा (Chhatrapati Sambhajinagar) वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *