Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

481 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या विषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या विषयी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीमकोर्टाने (Supreme Court) सीबीआयला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली.

न्या संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसुंद्दिन.अमनउल्लाह यांच्या समोर झालेल्या सुनावणी मध्ये ॲड.आनंद ग्रोव्हर आणि ॲड किशन कुमार यांनी ॲड अभय नेवागी यांच्या मार्फत तयार केलेल्या याचिकेवर बाजू मांडली. डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जरी संशयित आरोपींच्या वरती पुणे कोर्टात ट्रायल चालू आहे .सादर याचिका ही पुणे कोर्टातील खटल्याच्या देखरेखी साठी नसून ह्या खुनाचा सूत्रधार हा फरार असल्याविषयी आहे हे याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा मार्फत सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले .

डॉ दाभोलकर कॉ गोविंद पानसरे,गौरी लकेश आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून हे एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याचे याचिके मार्फत मांडण्यात आले आहे. तसेच या मागचे सूत्रधार फरार असे पर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जीवाला असलेला धोका कायम आहे हे याचिका कर्त्यांमार्फत मांडण्यात आले आहे. या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला त्याचा तपास बंद करण्याच्या भूमिके विषयी नोटीस बजावली.

Share This News

Related Post

महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे ; महाविकास आघाडीचं संयुक्त निवेदन

Posted by - January 31, 2022 0
राज्यात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन काढत महा विकास आघाडीचे…

कृरतेचा कळस ; फावड्यानं चिरला गळा, पत्नीच्या हत्येनंतर देखील पतीच्या ‘त्या’ कृत्याने गावात संतापाची लाट

Posted by - September 29, 2022 0
राग हा व्यक्तीच्या मनामध्ये साचत राहिला तर त्याचे केव्हा रुद्ररूप होऊन भडका होऊ शकतो हे सांगता येत नाही. पण कधी…

अहमदाबादमध्ये अकरा मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये भीषण आग; पंधरा वर्षीय तरुणीचा गॅलरीत अडकल्याने होरपळून दुर्दैवी अंत

Posted by - January 8, 2023 0
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी शाहीबाग भागात असणाऱ्या एका अकरा मजली इमारतीतील सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली होती.…

गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, पुण्यातील गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात…

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लवकरच दोनशे पोलीस शिपाई पदासाठी भरती : चंद्रकांत पाटील

Posted by - October 21, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *