सुप्रीम कोर्टात सुनावणी : शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ?

181 0

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टमध्ये होणार आहे. शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहेत. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील 17 तारखेला यावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र त्या दिवशी 28 नोव्हेंबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली.

महाराष्ट्रातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात 23 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयानं स्थिती जैसे थे ठेवत ओबीसी आरक्षणावरील सुनावणी 5 आठवड्यांनी पुढे ढकलली होती. सोबतच सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आधीच्या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं तसेच राज्यातील 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका शिंदे-फडणवीस सरकारनं केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता.

ओबीसी आरक्षणासंदर्भातला निकाल 92 नगरपरिषदांसाठीही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मग केवळ ओबीसी आरक्षण लागू न होणं हे अन्यायकारी ठरेल. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली. तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन आलं नव्हतं, असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला होता. राज्य सरकारचं म्हणणं होतं की, ज्यावेळी न्यायालयानं निकाल दिला, त्यावेळी कुठलंही नोटिफिकेशन या निवडणुकीचं निघालं नव्हतं. त्यामुळे न्यायालयानं याचा विचार करावा. राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण लागू होणार आहे. मग यात ओबीसी आरक्षण लागू होणार नसेल तर हा एक प्रकारे अन्याय आणि विरोधाभास ठरेल, असं सरकारनं म्हटलं होतं.

Share This News

Related Post

Kohinoor Diamond

अखेर! कोहिनूर हिर्‍याबाबतची ‘ती’ गोष्ट ब्रिटननं केली मान्य

Posted by - June 8, 2023 0
कोहिनूर हिऱ्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. कोहिनूर हिरा जेवढा मौल्यवान आणि अद्वितीय आहे तेवढाच तो वादग्रस्तही राहिला आहे. कोहिनूर हा मौल्यवान…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “..तेव्हा मला बाळासाहेबांनी खूप झापलं होतं”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Posted by - September 2, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची…
Pune Accident

Pune Accident : कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे पुण्यात भीषण अपघात

Posted by - July 10, 2023 0
पुणे : राज्यात अपघाताचे (Pune Accident) सत्र सुरूच आहे. पुण्यातील (Pune Accident) नऱ्हे येथे भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा अपघात झाला…

पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक आघोरी प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल’ तातडीने दिले कारवाईचे आदेश

Posted by - January 20, 2023 0
पुणे : पुणे सारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये संतती होण्यासाठी एका महिलेला घुबडाच्या हाडाची पावडर आणि मानवी मृतदेहाच्या हाडांची पावडर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *