भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का

258 0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा दणका बसला असून भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. 

काय आहे प्रकरण ?

मागील वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत ठराव मांडण्यात आला होता. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत हा ठराव होता. या ठरावाला भाजप आमदारांनी जोरदार विरोध केला. यावेळी भाजपच्या काही आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी विधानसभा अध्यक्षांनी वर्षभरासाठी निलंबन केले होते. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटले होते.

निलंबित केलेले आमदार 

आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)

अभिमन्यू पवार (औसा)

गिरीश महाजन (जामनेर)

पराग अळवणी (विलेपार्ले)

अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)

संजय कुटे (जामोद, जळगाव)

योगेश सागर (चारकोप)

हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)

जयकुमार रावल (सिंधखेड)

राम सातपुते (माळशिरस)

नारायण कुचे (बदनपूर, जालना)

बंटी भांगडिया (चिमूर)

Share This News

Related Post

Eknath And Uddhav

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ दोन शिलेदारांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - June 3, 2023 0
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे…

“जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” आजोबांचा ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार, असे समजले पालकांना

Posted by - January 11, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरंतर आई बाबांच्या व्यतिरिक्त घरातील आजी आजोबा , काका काकू ,…
Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

Posted by - June 12, 2023 0
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते…

पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर होण्याची शक्यता

Posted by - May 9, 2022 0
पुणे- सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *