अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावा, भाजप किसान मोर्चाचे पुण्यात धरणे आंदोलन

389 0

पुणे – राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आजपासून पुण्यातील साखर संकुल कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत शेतकरी संघटना, शेतकरी हे मैदानात उतरले होते. मात्र राज्यात अजूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यात अजूनही 50 हजार हेक्टरावर ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यात रखडलेल्या ऊसतोडीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

अतिरिक्त उसाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. निर्धारित कालावधी संपलेला असतानाही फडात ऊस हा उभाच आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उभा असलेला ऊस कारखान्यावर जातो की नाही अशी स्थिती आहे. हा प्रश्न घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित कारखाना आणि साखर आय़ुक्त यांना निवेदने दिली आहेत. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याकरिता लढा उभा केला होता. असे असताना आता अंतिम टप्प्यात भाजप किसान मोर्चाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

काय आहेत भाजपा किसान मोर्चाच्या मागण्या

-राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची हमी द्यावी.

-अतिरिक्त ऊसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याच्या बिलातून कपात करू नये. अतिरिक्त लागणारा खर्च राज्यशासनाने साखर कारखान्यांना द्यावा.

-गाळप झालेल्या जळीत उसाला व तोडणी कार्यक्रम पेक्षा उशिरा तोडलेल्या उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे.

-गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास शिल्लक ऊसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रूपये अनुदान द्यावे.

या आंदोलनात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, माजी मंत्री राम शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, पुणे शहराध्यक्ष भारत जगताप, विलास बाबर , उध्दवराव नाईक, उत्तमराव माने, रंगनाथ सोळंके, रोहित चिवटे, प्रदीप आडगावकर, केशव कामठे, मनोज फडतरे सहभागी झाले होते.

Share This News

Related Post

महावितरणचा आजपासून संप; पुण्यातील अनेक भागांतील वीज गायब

Posted by - January 4, 2023 0
पुणे: अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला…

प्रवीण तरडेंचा सरसेनापती हंबीरराव मोहिते लाजवाब, चित्रपटाचा ट्रेलर पाहा

Posted by - May 14, 2022 0
प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या सिनेमात प्रवीण तरडे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली; मनामनात लावणीचे लावण्य पोहचवणारी सूरसम्राज्ञी

Posted by - December 10, 2022 0
मुंबई : “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा…

MIT World Peace University : हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोकअदालतला चांगला प्रतिसाद

Posted by - October 4, 2022 0
पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *