इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के; 400 हून अधिक जखमी; 70 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

258 0

इंडोनेशिया : सोमवारी इंडोनेशियामध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे हाहाकार उडाला आहे.५.६ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने अनेक भागांमध्ये इमारती अक्षरशः हलू लागल्या होत्या. दरम्यान इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतामध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असून, पश्चिम जावा येथील चिआनजूर या गावामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते.

चिआनजूरमध्ये इमारती कोसळल्या, या इमारतींच्या मलब्याच्या ढिगार्‍याखाली अडकल्याने 70 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनेक जण या ठिकाणी अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. अचानक भूकंपाचे तीव्र धक्के जाणवू लागले. त्यानंतर इमारती घर आणि कार्यालयांमधील फर्निचर देखील हदरत होते. नागरिकांनी तातडीने इमारतींच्या बाहेर पळ काढला.

दरम्यान या भूकंपांच्या धक्क्यांमुळे सुनामीची भीती नाही असे स्पष्टीकरण हवामान विभागाने दिल्याने दिलासा आहे. तथापि नागरिकांनी काळजी घ्यावी, तर इमारतींपासून काही दिवस दूर राहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने या नागरिकांना तात्पुरते इतरत्र स्थलांतरित होण्याची व्यवस्था देखील केली आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

Posted by - March 11, 2023 0
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन…

अजितदादांना भाषण नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या

Posted by - June 14, 2022 0
पुणे- देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

यूजीसीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, हा आहे अखेरचा दिवस !

Posted by - May 23, 2022 0
नवी दिल्ली- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली…

पुणे शहरात हाय अलर्ट..! कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, पुणे महापालिकेचे खासगी आस्थापनांना आवाहन

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे शहर आणि परिसराला येत्या 48 तासात अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *